पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे केडीएमसीत १० नगरसेवक निवडून येणार – प्रमोद टाले


■पी.आर.पी. च्या कल्याण शहर उपाध्यक्षपदी दस्तगीर जमादार यांची नियुक्ती..


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे १० नगरसेवक निवडून येतील असा विश्वास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष तथा सभापती उल्हासनगर महापालिका प्रमोद टाले यांनी व्यक्त केला.           पी.आर.पी. च्या कल्याण शहर उपाध्यक्षपदी पत्रीपूल कचोरे येथील दस्तगीर जमादार यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला आघाडी ठाणे शहर संघटक ज्योती साबळे, कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष संतोष रोकडे, सुनील सोनावणे, साबीर शेख, उज्वला दावडे, राजेश पाटोळे, लइफ फातिमा, गुड्डू शेख, प्रवीन शेख, अमिना माशीलदार, फातिमा शेख मेहबूब माशीलदार आदी पादाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.   कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये इतर पक्षाच्या सर्वात पहिले पीपल्स रिपब्लिकन पक्षाने निवडणुकीचा बिगुल वाजवला असून संपूर्ण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी काम करणार आहे. कल्याण डोंबिवलीत रिपब्लिकन जनतेला, आंबेडकरी जनतेला एकत्र घेऊन कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये कमीत कमी दहा नगरसेवक आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रमोद टाले यांनी सांगितले.दस्तगिर जमादार यांनी जोमाने काम सुरू केले असून प्रभागातील सर्व जनतेने दस्तगिर यांच्या पाठीशी उभे राहुन  येणाऱ्या कालावधीमध्ये जातिवाद्यांना काढून टाकले पाहिजे असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले यांनी यावेळी केले. दरम्यान पक्षाने आपल्यावर सोपवलेली जवाबदारी योग्य रीतीने पार पाडून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि पक्ष संघटना वाढीसाठी सदैव तत्पर राहील अशी प्रतिक्रिया कल्याण शहर उपाध्यक्ष दस्तगीर जमादार यांनी दिली.

Post a Comment

0 Comments