कोट्यावधी रुपयांच्या रस्त्यांची कामे केल्याचा लेखा जोगा मांडणाऱ्या भाजपाने रस्त्यातील अपघातात बळींचा लेखाजोखा मांडणे गरजेचे – प्रमोद हिंदुराव


■ठाणे जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत प्रदेशाध्यक्षांचा तीन दिवसीय राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : ठाणे जिल्ह्यातील रस्त्याच्या दुरुस्ती साठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचा दाखला केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री देत असतात मात्र या रस्त्या वरील अपघातात बळी गेलेल्या नागरिकांच्या संख्येचा लेखा जोखा मांडणे गरजेचे असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेदश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी भाजपाला लगावला. राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने ठाणे जिल्ह्यात आयोजित केलेल्या तीन दिवसीय राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याची माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.    येत्या काही महिन्यात राज्यभरातील विविध जिल्ह्यातील महानगर पालिकेच्या निवडणुका  सामोरे जाण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असून जिल्ह्यातील विविध प्रश्न जनते समोर मांडण्यासाठी तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकत्याचे मेळावे, नेत्याचे दौरे, गाठी भेटीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी विशेष मोहीम तसेच कार्यकत्याचे प्रबोधन, भूमिकांचा प्रसार,जनतेच्या प्रश्नासाठी जन आंदोलन,संघर्ष आणि जनतेचा विकास तसेच ठाणे जिल्ह्यात भेडसावणाऱ्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सह राष्ट्रवादी मंत्री व प्रमुख नेत्याच्या उपस्थित शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथमीरा भाईंदरठाणे व कल्याणा डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात २३ ऑक्टोंबर ते २५ ऑक्टोंबर  कालावधीत तीन दिवशीय राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याचे आयोजन केले असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष प्रमोफ हिंदुराव यांनी दिली.ठाणे जिल्ह्यात बेरोजगारी, रस्त्याची दुर्दशा, ३५ सेक्शन कायद्यामुळे शेतकर्याचे होणारे शोषण कायदा रद्द करावा रेल्वे प्रवाश्याच्या सुरक्षेतेचा प्रश्न, मुरबाड रेल्वे त्वरित सुरू करावी. एक लसीचा डोस पूर्ण झालेल्यांनाही रेल्वेने प्रवासाला परवानगी द्यावी, बेरोजगारांना राष्ट्रीय कृत बँकेकडून व्यवसाय कर्ज मिळावे, महिलांसाठी स्वयंरोजगार बचतगटांना केंद्रासाठी तालुक्यात एमआयडीसी मध्ये जागा  उपलब्ध करून द्यावी. तसेच आदिवासी युवकांना उद्योग धंद्यासाठी युवा औद्योगिक वसाहत स्थापन करावी. ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात क्लस्टर चे काम प्राधान्याने सुरू करावे. कल्याण तालुक्यात मेडिकल कॉलेज सुरू करावे आदी प्रमुख मागण्या सोडविण्याचा प्रयत्न असणार असल्याचे सांगितले.दरम्यान एकीकडे भाजपने राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि त्यातील मंत्र्यांना विविध मुद्द्यावरून घेतले असतानाच आता राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी क्लस्टर योजनेवरून सरकारला घरचा आहेर दिला आहे. 'सरकार आमचे असले तरी वेळ पडल्यास आम्ही त्यांच्याविरोधात दोन हात करूअसा इशारा हिंदुराव यांनी देत त्यांनी एक प्रकारे घरचा आहेर दिलाय. यामुळे क्लस्टर योजनेवरून चक्क आपल्याच सरकारविरोधात दंड थोपटल्याचे दिसून आले. ठाणे शहरापर्यंत क्लस्टर आले असून कल्याण डोंबिवलीअंबरनाथउल्हासनगरकुलगाव बदलापूरभिवंडीमध्येही ही योजना लागू झाली पाहिजेजेणेकरून सामान्य माणसाला परवडणारी घरं मिळू शकतील असे सांगत राज्य सरकारला आम्ही त्यासाठी भाग पाडू अशी पक्षाची भूमिका असल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी यावेळी स्पष्ट केले.      ठाणे जिल्ह्यात आपल्याच सरकारचे दोन मंत्री असल्याबाबत आठवण करून दिली असता 'ओरडल्याशिवाय काहीही मिळत नाहीआमच्याच पक्षाचे सरकार असले तरी समाजासाठी त्यांच्याविरोधातही दोन हात करण्याची तयारी आम्ही ठेवल्याचे सांगत एकप्रकारे हिंदुराव यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला. एकीकडे गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांविरोधात भाजपने जोरदार आघाडी उघडली आहे. विविध मुद्दे आणि प्रश्नांवर भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या नाकी नऊ आणले आहेत. हे कमी म्हणून की काय आता थेट राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील उपाध्यक्ष पदासारख्या वरिष्ठ पदावरील नेत्यानेच आघाडी सरकारमधील मंत्र्यांना लक्ष केल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत दिसून आले.

Post a Comment

0 Comments