भोपर विभागात कमी दाबाने पाणी पुरवठा...माजी नगरसेविका रविना माळी यांचा पालिकेकडे पाठपुरावा


 
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या `प्रभाग क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भोपर गावात काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. स्थानिक माजी नगरसेविका रविना माळी यांच्याकडे नागरिकांनी पाण्यासंदर्भात भेट घेत समस्या मांडली.या समस्येकडे गांभीर्याने लक्ष पाणी प्रश्न सुटण्यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार केला.माजी नगरसेविका माळी व अमर माळी यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता किरण वाघमारे यांना निवेदन दिले.

    
    

  डोंबिवली पूर्वेकडील प्रभाग क्र. ११४ भोपरदेसलेपाडासंदप, मयुरेश्वर मंदिरविट भटी रोडपाटील नगरवेशीमाता नगरभोपर कमानी व भोपर गाव या विभागात गेल्या ६ दिवसापासुन कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यासंदर्भात प्रभागातील महिला सातत्याने तक्रारी करत असल्याने भाजप स्थानिक नगरसेविका रविना माळी यांनी दाखल घेतली .स्थानिक नगरसेविका रविना माळी आणि अमर माळी यांनी सोमवारी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता किरण वाघमारे यांना निवेदन दिले.
     

            यावेळी माळी म्हणाले, भोपर गावात पाणी पुरवठा योग्य दाबाने झाल्यास नागरिकांचा पाणी प्रश्न सुटू शकतो पाणी पुरवठा अधिकारी वाघमारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.

Post a Comment

0 Comments