कल्याण , कुणाल म्हात्रे : गतका फेडरेशन द्वारा आयोजित दोन दिवसीय पाचवी ओपन गतका चॅम्पियनशिप २-३ ऑक्टोंबर दरम्यान पटियाला स्थित नॅशनल कॉलेज ऑफ फिसिकल एज्युकेशन येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रासहित पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, मणिपूर, झारखंड, बिहार, तेलंगणा, तामिळनाडू, आसाम, राजस्थान, दिल्ली, चंदिगढ, केरला, नागालँड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, साई, त्रिपुरा, गोवा, छत्तीसगढ ह्या राज्यातून ५५० पेक्षा अधिक महिला व पुरुष खेळाडू यांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्रातील खेळाडूंनी तब्बल २६ पदके पटकावली. त्यामध्ये १ सुवर्ण, १० रजत, ३ कास्य पदके यांचा समावेश आहे.
या स्पर्धेदरम्यान ऑल महाराष्ट्रा गतका असोसिशनच्या जनरल सेक्रेटरी प्रोफे. आरती चौधरी (आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक) यांचा सन्मान गतका फेडरेशन ऑफ इंडिया चे कार्यकारी अध्यक्ष सरदार राजेंद्र सिंह सोय व इतर मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. महाराष्ट्र संघाच्या कामगिरीमागे संघ अधिकारी डॉ. अमरप्रीत जिया खान व कोच संजय बनसोडे यांचा मोलाचं वाटा आहे. महाराष्ट्र संघाच्या घवघवीत यशाबद्दल ऑल महाराष्ट्रा गतका असोसिएनचे अध्यक्ष संतोष चौधरी, उपाध्यक्ष आश्र्विनी महांगडे, जनरल सेक्रेटरी प्रॉफे. आरती चौधरी, खजिनदार ॲड. सायली जाधव, सदस्य योगगुरू अविनाश अनपट, ॲड. मृण्मयी जाधव, एक्स आर्मी ऑफिसर रवींद्र चौधरी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढे अशीच प्रगती करत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पदक विजेते खेळाडू
महिला वर्ग : निर्जला बोरकर - सुवर्ण, रजत, सारा शेख- रजत, सिद्धी जाधव - रजत, अर्षिता सिंग- रजत, गौरी बोरकर- रजत, श्रेया दांडे - रजत, रोशनी जोगदंड - कास्य, पूजा गायकवाड- कास्य.
0 Comments