शिवसेनच्या वतीने भरविण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरात नागरिकांची गर्दी
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्व. बाबासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या सहकार्याने गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यत डोंबिवली पुर्वेकडील डीएनसी शाळेच्या पटांगणात रासरंग २०२१ येथे मोफत आरोग्य शिबिर भरविण्यात आले होते.शिबिरात ईसीजी, किडनीस्टोन, कॅन्सर,नाक-कान-घसा तपासणी, नेत्रचिकित्सा, मोफत चष्मा वाटप,आरोग्य तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू असलेल्या व्यक्तीस मोफत ऑपरेशन केले जाणार आहे.            यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर विनिता राणे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, राजेश कदम,परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे,उपशहरप्रमुख किशोर मानकामे,शाखाप्रमुख अजय घरत, बबन जगताप, करण भगत, संतोष चव्हाण आदि उपस्थित होते. यावेळी परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे म्हणाले,शिबिरात अनेक नागरिक लाभ घेतला. शिवसेना नेहमी जनतेच्या सेवेसाठी पुढे असते.नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याने अश्या प्रकारची शिबिरे भरविली जातात.

Post a Comment

0 Comments