क्रॉम्प्टनने आणले आहेत घराचा जादूई कायापालट घडवून आणणारे तसेच मूड सुधारणारे नवीन स्टार लॉर्ड थ्री इन वन रेसेस्ड पॅनल्स

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२१ : वैविध्यपूर्ण लायटिंग सोल्युशन्सच्या क्षेत्रातील ७५ वर्षांहून प्रदीर्घ अनुभव तसेच समृद्ध वारसा असलेल्या भारतातील क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल लिमिटेड या ब्रॅण्डने आज आपले स्टार लॉर्ड ३-इन-१ हे नवीन नवोन्मेषकारी उत्पादन सर्वांपुढे आणले. गेल्या वर्षी ब्रॅण्डने ‘स्टार लॉर्ड’ या कमाल प्रकाश देणाऱ्या व शैलीदार सीलिंग लाइट्सचे लाँचिंग यशस्वीरित्या केले होते.         हे ब्रॅण्डचे फ्लॅगशिप उत्पादन ठरले. आता ब्रॅण्डने नवीन स्टार लॉर्ड ३-इन-१ रेसेस्ड पॅनल्सच्या माध्यमातून हा नवोन्मेष आणखी उंचीवर नेला आहे. एकाच उत्पादनामध्ये पांढऱ्या प्रकाशाच्या ३ वेगवेगळ्या छटा देणारे हे नवीन उत्पादन तुमच्या मूडप्रमाणे व दिवसाच्या वेळेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाशित होऊन वातावरणनिर्मिती करेल. या नव्या प्रकाशयोजनेमुळे तुमच्या घराचा चेहराच पालटून जाईल.         आज सीलिंग लाइट्स तुमच्या घराच्या सजावटीत/सौंदर्यात विनासायास भर घालत आहेत. शिवाय वातावरणही अधिक प्रसन्न व उत्साही करत आहेत. या प्रकाशयोजनेमुळे चित्तवृत्ती तर खुलतातच, शिवाय तुम्हाला आवश्यक कामे करण्यासाठी हवी तशी कार्यात्मकता मिळते आणि त्यामुळे उत्पादनक्षमतेला प्रेरणाही मिळते.          आपण अजूनही घरामध्येच जास्त वेळ घालवत असल्यामुळे घरातील खोल्या आता वेगवेगळ्या कामांसाठी वापरल्या जात आहेत. अशा वेळी प्रकाशयोजनेत बदल करून एकच खोली वेगवेगळ्या कामांसाठी करता येतो. प्रकाशाच्या रंगात, नियंत्रणात आणि योजनेत बदल करून कधी ती खोली वर्क फ्रॉम होमसाठी वापरली जाऊ शकते, तर कधी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून वापरली जाऊ शकते.          प्रकाशयोजनेचा आपल्या घरावर व चित्तवृत्तींवर खोलवर परिणाम होतो या मुद्दयाचे महत्त्व लक्षात घेऊन, क्रॉम्प्टनचे नवीन स्टार लॉर्ड ३ इन १ रिसेस्ड पॅनल श्रेणी विकसित करण्यात आली आहे. ही नवोन्मेषकारी तसेच एकाच उत्पादनातून अनेक बाबी साध्य करणारी श्रेणी आहे. या श्रेणीतील उत्पादने तुमच्या घराचे स्वरूप जादुई पद्धतीने बदलून टाकतील आणि चित्तवृत्ती प्रसन्न राहाव्यात या दृष्टीने आकर्षक वातावरण तयार करतील. या उत्पादनातील समृद्ध फीचर्स पुढीलप्रमाणे आहेत:         अधिक चांगल्या फिटिंगसाठी एकात्मिक ड्रायव्हर – या उत्पादनामध्ये फिटमेंटची कटकट काढून टाकण्यात आली आहे. यामुळे हे लाइट्स बसवण्यास सोपे आहेत आणि ते बदलणेही अत्यंत सुलभ आहे.


वॉरंटी – २ वर्षे


स्टार लॉर्ड थ्री इन वन रेसेस्ड पॅनलची किंमत कट-आउट व वॉटेज (डब्ल्यू)नुसार पुढीलप्रमाणे: ५ वॅट्स व ४ इंची पॅनलची किंमत ६५० रुपये; १० वॅट्स व ५ इंची पॅनलची किंमत ८५० रुपये; १५ वॅट्स व ६ इंची पॅनलची किंमत १०५० रुपये. ही उत्पादने भारतभरात तसेच सर्व आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत.

Post a Comment

0 Comments