माजी महापौरांच्या प्रभागात विशेष स्वच्छता मोहीम
डोंबिवली ( शंकर  जाधव ) करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शहरातील स्वच्छता करणे आवश्यक आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर विनिता राणे यांच्या डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली  (प्रभाग क्र ६४ ) येथे रविवारी सकाळी पालिकेच्या सहकार्याने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, पालिका घनकचरा व्यवस्थापन अधिकारी,कर्मचारी आणि परिसरातील नागरीक उपस्थित होते.


          यावेळी माजी नगरसेवक राणे म्हणाले, दिवाळी सणाच्या आधी लोक आपल्या घरातील जुने फर्निचर , वस्तू बाहेर टाकतात.या वस्तू आणि परिसरातील रस्त्याच्या कडेला पडलेले कचरा उचलण्यात आला.तर प्रभागात पी १ आणि पी २ करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे.सकाळपासून सुरु असलेल्या स्वच्छता मोहमेनंतर प्रभागाचा कायापालट झाल्यासारखे दिसत होते.

Post a Comment

0 Comments