रस्ते बाधितांच्या पुनर्वसनासाठी मनसेचे केडीएमसी मुख्यालयात ठिय्या आंदोलन अतिरिक्त आयुक्तांची घेतली भेट
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण-पत्री पूलाच्या रस्ते विकास कामात बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी आज मनसेच्या वतीने कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आाले. या आंदोलनास सुरक्षा रक्षकांनी मज्जाव करीत कार्यकर्त्यांच्या हातातील फलक हिसकावून घेण्यात आले. मात्र आंदोलक काही हटण्यास तयार नव्हते. अतिरिक्त आयुक्तांच्या भेटीपश्चात आंदोलकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे.       कल्याण पत्री पूलाच्या कामात अनेकांची घरे तोडण्यात आली. या तोडण्यात आलेल्या रस्ते बाधितांचे महापालिकेच्या बीएसयूपी प्रकल्पात पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी बाधितांनी केली आहे. यासाठी बाधित महापालिका मुख्यालयात वारंवार फेऱ्या मारत आहे. त्यांना आयुक्त भेट देत नसल्याने त्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही. या प्रकरणी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी  बाधितांना घेऊन आज दुपारीत तीन वाजता मुख्यालय गाठले. बाधितांनी आयुक्तांना भेटण्याची मागणी केली. त्यावेळी आयुक्त त्यांच्या दालनात उपस्थित नव्हते. तेव्हा दुस:या मजल्याच्या व्हरांडय़ातच बाधितांनी ठिय्या आंदोलन सुरु केले.त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना मज्जाव केला. त्यांच्या हातातील फलक हिसकावून घेतले. तसेच गळयातील पक्षाचे मफलर काढण्या भाग पाडले. मात्र आंदोलक हटण्यास तयार नव्हते. आधी आयुक्तांना सांगा आम्हाला भेट द्या. मगच आम्ही याठिकाणीहून उठू अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी एक ज्येष्ठ नागरीक राम पांडे यांचे घर रस्ते प्रकल्पात बाधित झाले आहे. त्यांना तर रडूच कोसळले. त्यावेळी सर्व आंदोलकांनी पांडे यांना काय मेल्यावर न्याय मिळणार आहे का असा संतप्त सवाल केला. या प्रकरणात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पत्र दिले आहे. मात्र त्या पत्रचे साधे उत्तर देण्यास प्रशासनास वेळ नाही.अखेरीस मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली बाधितांचे एक शिष्टमंडळ अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांची भेट घेतली. दिवाळी पूर्वी हा विषय सोडवावा अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करु अशा इशारा प्रशासनास दिला आहे.

Post a Comment

0 Comments