वाचन मंदिर भिवंडी तर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा, मुलांनी वाचनाची सवय सातत्याने ठेवावी ...शिक्षिका प्राजक्ता कुलकर्णी
भिवंडी , प्रतिनिधी  :  वाचन हा आपल्या अभ्यासाचा व सवयीचा भाग असायला हवा, वाचनाने विद्यार्थी अधिक कृतिशील व विचाराने प्रगल्भ होतो, अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी अवांतर वाचन हा एक आपल्या सवयीचा भाग असायला हवा असे उद्गार प.रा.विद्यालयाच्या शिक्षिका प्राजक्ता कुलकर्णी यांनी काढले. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंतीचे औचित्य साधून वाचन मंदिर तर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच 75 व्या वर्षात  आंतरशालेय निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.          या स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्राजक्ता कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन करताना कुलकर्णी  बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुधीर सिंगासने, कार्यवाह किशोर नागवेकर, खजिनदार उज्ज्वल कुंभार, कला शिक्षक संतोष बळीराम भोईर इत्यादी उपस्थित होते.          डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. भारतीय भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त शालेय विद्यार्थ्यांकरता आंतर निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ नुकताच पार पडला. सदर स्पर्धेत विविध शाळांमधून 91 निबंध व 81 देशभक्तीपर चित्रे प्राप्त झाली.            त्याचा बक्षीस समारंभ डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंतीच्या निमित्ताने शारदीय प्रबोधन माला आयोजित करण्यात येते या उपक्रमात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन देखील केले होते.कार्यक्रमाची सुरवात  सरस्वती पूजनाने करण्यात आली. निंबध स्पर्धांचे परीक्षक म्हणून सौ.प्राजक्ता दत्तात्रेय कुलकर्णी तर ■श्री. संतोष बळीराम भोईर 


चित्रकला स्पर्धा परीक्षण करून विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन केले. यावेळी  विज्ञान विषयावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन देखील आयोजित केले होते . याला देखील विद्यार्थी वर्गाने चांगला आनंद घेतला.             कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारणी सदस्य योगेश वल्लाल, प्रसाद पुण्यार्थी, अंजली घुगरे, राधा जोशी, ग्रंथपाल सुजाता वडके, प्रणाली खोडे, शलका मदन यांनी विशेष मेहनत घेतली, शेवटी कार्यवाह किशोर नागावेकर यांनी सर्व उपस्थित यांचं आभार मानले.

Post a Comment

0 Comments