कल्याण मधील वाढत्या गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या विक्री बाबत भाजपा आक्रमक आमदार गणपत गायकवाड यांचा यलगार
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण मधील वाढत्या अमली पदार्थांच्या विक्री व सेवन पाठोपाठ वाढणाऱ्या गुन्हेगारी बाबत शासन तसेच पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्वेतील काटेमनिवली येथे आंदोलन केले.कल्याण पूर्वेत वारंवार होणारी गुन्हेगारी व दहशतीचे वातावरण नुकत्याच वयात आलेल्या मुलांना व्यसनाच्या आधीन लावणारे व त्या अनुषंगाने होणारी अंमली पदार्थाची विक्री व सेवन ही चिंताजनक बाब बनली आहे. या सर्वांना वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी कल्याण मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या नियोजनात आंदोलन छेडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


यावेळी भारतीय जनता पार्टीचे मंडल उपाध्यक्ष विजय उपाध्याय, अरुण दिघेपांडुरंग भोसलेनितेश म्हात्रेमाजी नगरसेवक विक्रम तरे,   गुड्डू खान, महाराष्ट्र प्रदेश सदस्य संदीप तांबे,  महिला मंडळ अध्यक्ष प्रिया जाधव, वंदना मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments