कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील तीन प्रभागांत विकासकामांचा धडाका


आमदार राजू पाटील यांच्या निधीतून १ कोटी ८० लाखांच्या कामांचे भूमि पूजन...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील कल्याण पूर्व भागातील तीन प्रभागांत विकासकामांचा धडाका उडाला असून मनसे आमदार राजू पाटील यांच्या आमदार निधीतून १ कोटी ८० लाखांच्या कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले. कल्याण ग्रामीण मधील लोकग्राम, मेट्रोमॉल, नेतिवली टेकडी, कचोरे या प्रभागांत विविध विकासकामांचे आमदार राजू पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.या भूमिपूजन कार्यक्रमात राजू पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. विकासकामांच्या गुणवत्ते बाबत लोकांचा रोष झाला तर कोणाला तरी निलंबित करायचं, पुन्हा त्याला कामावर घ्यायचे व आपले काम पुन्हा सुरू करायचे. मात्र संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करायची नाही अशी या शिवसेनेची भूमिका असल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला. त्याचप्रमाणे कल्याणच्या ऐतिहासिक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कला केंद्र यासारख्या अनेक वास्तु आहेत ज्या बीओटी तत्त्वावर घेतल्या  आहेत मात्र त्यांचा कुठलाही उपयोग होत नाही. याचा अर्थ बीओटी तत्त्वावर घ्यावे आणि पीपीपी म्हणजे खा खा खा धंदे करण्याचं काम सत्ताधारी शिवसेना करत असल्याची टीका राजू पाटील यांनी केली.  त्याचबरोबर भारत - पाक समाना विषयी बोलताना देशाचे सैनिक धारातीर्थी पडत आहेत आणि पाकिस्तान सोबत सामना खेळणे योग्य नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली असून त्यांचा कल कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे  असा सवाल करत मनसे आमदार राजू पाटील करत प्रत्येक हिंदुस्तानी नागरीकाला वाटेल की भारत - पाक समाना खेळू नये असे सांगितले.

Post a Comment

0 Comments