ठाणे महापौर राष्ट्रीय छायाचित्र ‘’ स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रांचे प्रदर्शन हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे भरणार प्रदर्शन
ठाणे  , प्रतिनिधी  : ठाणे महानगरपालिका, ठाणे व फोटो सर्कल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘’ठाणे महापौर चषक राष्ट्रीय छायाचित्र’’ स्पर्धा गेली 22 वर्षे आयोजित करण्यात येत आहे. यंदाही 15 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या कलावधीत झालेल्या या स्पर्धेतील विजेत्या 100 छायाचित्रांचे प्रदर्शन 26 ते 28 नोव्हेबर 2021 या कालावधीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.         महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेस उप महापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होते.      कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करुन छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा 15 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली या स्पर्धेमध्ये भारतातील छायाचित्रकारांचा समावेश होता. तसेच विशेष करुन ठाणे जिल्ह्यासाठी राखीव विषयांमध्ये ठाण्यातील ग्रामीण व शहरी भागातील छायाचित्रकारांनी सहभाग घेतला.        या राष्ट्रीय स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. बी.के सिन्हा (पटणा), रोहिंग्टन मेहता (मुंबई), शीवजी जोशी (जोधपूर राजस्थान), सोना बिनिवाल (दिल्ली) यांनी काम पाहिले. तर राष्ट्रीय स्पर्धेचे ठाणे जिल्हा परीक्षक म्हणून किरण तांबट (नाशिक), संजीव हजारे (ठाणे), सुभाष आव्हाड (ठाणे) यांनी काम पाहिले. एकूण साडेपाच लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या स्पर्धेतील पारितोषिकांचे स्वरुप आहे.     तरी जास्तीत जास्त ठाणेकरांनी कोरोना नियमावलीचे पालन करुन या छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments