Header AD

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये खासदार निधीतून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा लोकार्पण - खासदार राजन विचारे




नवी मुंबई,  प्रतिनिधी  :  जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्र. १३ मधील ऐरोली गाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरिता बांधण्यात आलेल्या नवीन विरंगुळा केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला.



         त्यावेळी सोहळ्यास जिल्हाप्रमुख श्री. विठ्ठल मोरे, श्री. द्वारकानाथ भोईर, मा. विरोधी पक्षनेता विजय चौगुले, मा. नगरसेवक मनोज हळदणकर, मा आकाश मढवी, करण मढवी, श्री. नवीन गवते, श्री. चेतन नाईक, श्री. संजू वाडे मा. नगरसेविका नंदा काटे, व समस्त शिवसैनिक, पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.



         ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या विनंती नुसार नगरसेवक मनोज हळदणकर आणि नगरसेविका नंदा काटे यांनी खासदार राजन विचारे यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधण्याकरिता खासदार निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली होती. 



           खासदार राजन विचारे यांनी विलंब न लावता ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हाव्ही यासाठी आपल्या खासदार निधीतून २० लाख खर्च करून हा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारला. माझ्या खासदार निधीचा अशा सुंदर वास्तूसाठी उपयोग झाला याचा मला आनंद आहे. तसेच या विरंगुळा केंद्राचा ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच फायदा होईल असे खासदार राजन विचारे यांनी म्हंटले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये खासदार निधीतून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा लोकार्पण - खासदार राजन विचारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये खासदार निधीतून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा लोकार्पण - खासदार राजन विचारे Reviewed by News1 Marathi on October 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads