केडीएमसीच्या विशेष स्वच्छता मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग

   कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  या महिन्यात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी राबविल्या जाणा-या कायापालट अभियानांतर्गत आज टाटा पावर ते पत्री पूल तसेच शहाड सर्कलबंदरपाडा ते उल्हास नदीच्या पहिल्या पूलापर्यंत विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.              या मोहिमेमध्ये घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरेअ प्रभागाचे सहा. आयुक्त राजेश सावंतसहा. सार्वजनिक आरोग्य अधिकारी घुटेअ प्रभागाचे मुख्य आरोग्य निरिक्षक व इतर आरोग्य निरिक्षककर्मचारी वर्ग तसेच अग्निशमन विभागाचे कर्मचारी यांचे समवेत मातोश्री वेलजीबाई देढीया या महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य कोमल चंदनशिवेया संस्थेचे सचिव डॉ. गिरीश लटके यांचेसह सुमारे १५०  विदयार्थी/ विदयार्थिनी यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला होता.या स्वच्छता मोहिमेत रस्ते सफाई,  रस्ते दुभाजक व लगतच्या पट्टया सफाई व दुभाजकावरील गवत व रस्त्यालगत असलेले रॅबीट काढण्यात आले व त्या ठिकाणी जंतुनाशक पावडर फवारणी करण्यात आली. त्याचप्रमाणे काल पत्री पूल ते कचोरे तसेच 90 फुटी रोडवर "विशेष स्वच्छता" मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे तसेच इतर अधिकारी /कर्मचारी यांच्या  समवेत सुरक्षा ॲकॅडमीडोंबिवली या सेवाभावी संस्थेच्या प्रतिनिधींनी देखील सक्रीय सहभाग घेतला. या संस्थेचे प्रतिनिधी यापुढे दर शनिवारी महापालिका परिसरात स्वेच्छेने स्वच्छता मोहिम राबविणार आहेत.

Post a Comment

0 Comments