संघटना कार्यकर्त्यांला कायद्याचा अभ्यास आवश्यक जगदीश खैरालिया
ठाणे , प्रतिनिधी  : कामगारांवर होणारे  प्रशासकीय अन्याय दुर करायचे असल्यास संगठनेचे नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांला कायद्याचा अभ्यास असणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन एस.टी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात  कामगार नेते जगदीश खैरालिया यांनी केले ठाण्यातील कासारवडवली येथे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा व कोविड योद्ध्यांचा सन्मान असा कार्यक्रम नुकताच संप्पन्न झाला या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे होते.           करोना काळात जीवाची तमा न बाळगता काम केलेल्या एस.टी.मधील इंटक सभासदांना "कोरोनायोद्धा" म्हणून सन्मान पत्र देउन ज जगदिश खैरालिया यांच्या हस्ते गौरविण्यात आले.कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांनी जे काम केलेले आहे त्या कामासाठी सलामच केला पाहीजे असे खैरालिया म्हणाले वास्तविक सर्वत्रच एस.टी कर्मचारी व अधिका-याचे कोरोना कालावधीतील कामाचे कौतुक होत होते.              परंतु त्यांच्या योगदानाची दखल इंटकने घेउन त्याना आज सन्मानित करण्यात येत आहे.आपल्या संघटनेकडून दिलेले हे सन्मानपत्र भले त्याला कायदेशीर मान्यता नसेलही पण तो नुसता कागदाचा तुकडा नसुन हा आपण  केलेल्या कोरोना काळातील कामाच्या शाबासकीचं आपल्या संघटनेने दिलेलं  कौतुक पत्र आहे असे जगदीश खैरालिया यांनी आपल्या भाषणात  बोलताना खास  अधोरेखित केले  आहे।.....           इंटकच्या या  स्नेहमेळाव्याला एसटी ईंटकचे जेष्ठ सल्लागार दादा कदम यांनी ही युनियनचं काम कसं करायला हवे याबाबत मार्गदर्शन केले, ठाणे जिल्ह्यातील विविध आगारातुन अनेक इंटक कार्यकर्ते मेळाव्यासाठी उपस्थित होते.          व्यासपीठावर जेष्ठ सल्लागार दादा कदम,माजी सचिव शांताराम पाटील,  नितिन आयरे ,दिगंबर भडकमकर , सचिव शामराव भोईर,कार्याध्यक्ष विजय तारमळे,खजिनदार सुभाष पवार, घोडबंदर रोड प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोर भोईर,सहसचिव मनेश सोनकांबळे महिला संघटक ललिता खरे आदि मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक सचिव शामराव भोईर यांनी तर सुत्रसंचालन रत्नपाल जाधव यांनी केले.

Post a Comment

0 Comments