स्वर्गीय विजय दादा पाटील मित्र मंडळाच्या वतीने देवीची महाआरती


■कुणाल दादा दिनकरशेठ पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजन.....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कुणाल दादा दिनकरशेठ पाटील फाउंडेशन,  स्वर्गीय विजय दादा पाटील मित्र मंडळस्वर्गीय दिनकर काका पाटील महिला बचत गट आणि राकेश कदम युवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवातील देवीची मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात महाआरती करण्यात आली. सालाबाद प्रमाणे यंदाही आडीवली ढोकळी येथे या मंडळाच्या वतीने नऊ दिवस कल्याण डोंबिवली महानगर नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पुढाकाराने नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला.नऊ दिवस भक्तीभावाने देवीचे पूजन करून शेवटच्या दिवशी महा भंडाराचे देखील आयोजन  करण्यात आले होते. याचा तीन हजार भाविकांनी लाभ घेतला. तसेच नऊ दिवस विविध भजनी मंडळ किर्तन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना सावट असल्याने  गरबा बंद आहे तरीपण हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामधून बक्षिसं काढून ९ महिलांना आकर्षक पैठणी भेट म्हणून देण्यात आली. तसेच लहान मुलांना देखील भेटवस्तू देण्यात आल्या.यावेळी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह समाजसेविका श्वेता पाटीलउद्योगपती अनिल पाटील,  नकुल भोईर,  विजय लासुरेसचिन मानेआदींसह मंडळाचे कार्यकर्ते बचत गटाच्या महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments