काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना अटक केल्या प्रकरणी डोंबिवलीत निदर्शने...
डोंबिवली ( शंकर जाधव ) उत्तरप्रदेश येथे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना अटक केल्याप्रकरणी आणि शेतकऱ्यांच्या हत्येप्रकरणी डोंबिवली पूर्वकडील इंदिरा चौकात  कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.          यावेळी काँग्रेस पदाधिकारी नवीन सिंग, पॉली जेकब, राजकुमार हेरावत, अशोक कापडणे, अजय पौळकर, नवेंदु पाठारे, प्रमोद त्यागी, श्रेयस सिंग, संजय पाटील, राजू सोनी, निवृत्त जोशी, प्रवीण पाटील, सचिन धुरी, विनोद पिल्ले, विनाँय देवाकिया, के.जाँस आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.       यावेळी नवीन सिंग म्हणाले, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अटक केल्याने आम्ही योगी सरकारचा निषेध करतो.हे सरकार  ठोसशाही सरकार आहे.पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही हे सरकार येऊ देत नाही.

Post a Comment

0 Comments