द बॅनियन संस्थेमार्फत जागतीक मानसिक आरोग्य दिवस साजरा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : द बॅनियन ही संस्था मागील तीन ते चार वर्षांपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात मानसिक आरोग्यासाठी काम करत आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या माध्यमातून अघई -जांभूळ पाडा आणि पलीचापाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण यादवहौशीराम दिनेश  यांनी केले. तर प्रास्ताविक निलेश व करुणा यांनी मांडले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भरत वळंबाराजेंद्र भवरतसेच आशा वर्कर आणि अंगणवाडी कर्मचारी व जांभूळपाडापलीचापाडामाळीपाडाहसणेपाडारावतेपाडा येथील नागरिक आणि मुले उपस्थित होती. विविध खेळचर्चासत्रे आणि मनोरंजनाच्या माध्यमातून नागरिकांना शारीरिक आरोग्यमानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य या संदर्भात  माहिती देण्यात आली. टाटा इन्स्टिट्यूट चे प्रशिक्षणार्थी निषादप्रांजलीअश्विनीरेमा यांनी विविध सत्र आणि खेळ या मार्फत  मानसिकशारीरिक आणि सामाजिक आरोग्याचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रगती संस्थादिपक रावतेसुमित दोडेराजेश्वरी काटकर ,दिव्या सिंगजान्हवी माळी,सुवर्णा ताईरंजना विशेसविता गवळीसविता तरेमुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी साईनाथहौशीराम यांनी मोलाचे  योगदान दिले.

Post a Comment

0 Comments