डोंबिवली तील रांगोळी कलाकार स्मिता साळुंखे साकारली रंगोळीतून सप्तशृंगी देवीचे रूप
डोंबिवली ( शंकर जाधव ) सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून कलेचे उच्च शिक्षण प्राप्त रांगोळी कलाकार स्मिता साळुंखे यांनी सप्तशृंगी देवीची रांगोळी ४ बाय ४   फूट आकारात फरशीवर रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहे. रांगोळीत सप्तशृंगी देवीचे  रूप अवतरले असा प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळत आहे.या रांगोळीचे खूप कौतुक होत असून त्यांना छान अभिप्राय येत आहेत.          या रांगोळी दरम्यान साळुंखे यांनी सांगितले की,ड्रॉईंग, पेंटिंग हस्तकला यासोबत मला रांगोळीची आवड होतीच. परंतु तीन वर्षांपासून मी विविध प्रकारच्या पोस्टर रांगोळ्या रेखाटण्याचा  प्रयत्न करीत आहे. नवरात्रौत्सवाच्या  निमित्ताने या वर्षी मी माझ्या घरात  सप्तश्रुंगी देवीची ही रांगोळी रेखाटली आहे. ही रांगोळी ४×४फूट एवढ्या आकाराची असून ती पुर्ण करण्यासाठी मला चार दिवस लागले व ८-९ किलो रांगोळी लागली.देवी व दागिने व इतर अनेक बारकावे  दाखण्याचा मी प्रयत्न केला.             या रांगोळीसाठी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.त्यासाठी मी सर्वांची खूप आभारी आहे.कलेची आवड असलेल्या मुलांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी कसे होता येईल यासाठी प्रयत्न करत असते.यामुळे  त्यांची कला सादर करण्यासाठी वाव मिळतो.तसेच कलाप्रेमीनीं रांगोळीद्वारे आपली कला सादर करत हा वारसा पुढे नेला पाहिजे.            सप्तशृंगी देवीची रांगोळी 4 X4  फूट आकारात फरशीवर रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहे. ही रांगोळी काढायला मला तीन ते चार दिवसांचा वेळ लागला. देवीचे रूप तसेच दागिने असे बारकावे खूप होते. एकूण रांगोळीचा खर्च १२०० ते १४०० रुपये एवढा आला. एक मनातील इच्छा म्हणून मी ही रांगोळी साकारली आहे.

Post a Comment

0 Comments