शहापूर येथे रविवारी होणाऱ्या विधी सेवा शिबिराच्या तयारीचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशां कडून आढावा आदिवासी भागातील अंगणवाडीला दिली भेट
ठाणे, दि.१६ (जिमाका)  :  महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या आजादी का अमृत महोत्सव या अभियानांतर्गत आज शहापूर तालुक्यातील शिलोत्तर या आदिवासी भागातील अंगणवाडी केंद्राला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल पानसरे यांनी भेट दिली.        या केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांकरीता तालुका विधी सेवा समिती मार्फत "विधी सेवा जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्या. पानसरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा न्यायाधीश-१ एन के ब्रम्हे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. आर. देशपांडे, सह दिवाणी न्यायाधीश ए.डी. वामन यावेळी उपस्थित होते.        दरम्यान, न्या. श्री. पानसरे यांनी  सापगाव येथील अन्नपूर्णा लॉन्स, शेरे पाडा येथे भेट देऊन उद्या रविवारी आयोजित करण्यात आलेल्या "विधी सेवा शिबीर" व शासकीय योजनांच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला. जास्तीत जास्त नागरिकांनी "विधी सेवा शिबीराला भेट देऊन योजनांची माहिती आणि लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments