उत्पादक-केंद्रित शाश्वत कृषी कार्यक्रम 'अॅगोरो कार्बन अलायन्स’ची सुरुवात


भारताच्या खाद्य प्रणालीचे डीकार्बानायझेशन सक्षम करण्याचा उद्देश ~


मुंबई, ७ ऑक्टोबर २०२१ : पॉझिटिव्ह कार्बन अॅक्शन द्वारे शेतकर्‍यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता यावे या उद्देशाने बनवण्यात आलेला ग्लोबल बिझनेस अॅगोरो कार्बन अलायन्स आज भारतात लॉन्च होत आहे. जगभरातील क्रॉप न्यूट्रिशनमधील जागतिक अॅग्रीकल्चर लीडर्सपैकी एक यारा द्वारा समर्थित आणि याराची जागतिक पोहोच, स्थानिक शेतकर्‍यांशी संबंध आणि सुमारे ११५ वर्षांचे सिद्ध कृषी इनोव्हेशन यांच्या पाठबळावर अधिक टिकाऊ आणि लाभदायक फूड फ्यूचर निर्माण करण्याचा अॅगोरो कार्बन अलायन्सचा उद्देश आहे.            अॅगोरो कार्बन अलायन्स भारतीय शेतक-यांना पिकांचे उत्पादन कायम राखून किंवा उलट वाढवून, कार्बन क्रॉपिंगमधून अतिरिक्त, शाश्वत उत्पन्न उभे करण्यास सक्षम करेल. अॅगोरो कार्बन भारतीय शेतकर्‍यांना सोल्युशनच्या केंद्रस्थानी ठेवतो आणि त्यांना कामकाज बदलण्यासाठी प्रोत्साहित करतो तसेच त्यांना अशा व्यवसायांच्या वाढत्या संख्येत सामील करतो, जे आपल्या हवामान प्रतिज्ञा प्राप्त करू इच्छित आहेत.          अॅगोरो कार्बन अलायन्सचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज सेन शर्मा म्हणाले, “भारताचे साधनसंपन्न शेतकरी मोठ्या कृषी क्रांतींमध्ये अग्रस्थानी राहिले आहेत. अॅगोरोचे लक्ष्य आगामी प्रचंड कृषी क्रांतीत झेप घेण्याचे आहे, ज्यात शेतकरी स्थानिक स्तरावर नेतृत्व करतील. अॅगोरो कार्बन लक्षावधी भारतीय शेतकर्‍यांना अत्याधुनिक डिजिटल कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, ज्यामुळे हायपरलोकल आणि ग्रॅन्यूअल डिसीझन सपोर्ट यंत्रणा सक्षम होईल. शिवाय, हा मंच डायरेक्ट मार्केट लिंकेज बनवेल आणि स्थानिक उत्पादकांचे शोध जागतिक स्तरावर घेऊन जाईल.           या पृथ्वीवरील आपल्या सामूहिक भविष्यासाठी विचार करण्याचे सर्वांगीण आणि नवीन मार्ग अंगिकारण्यासाठी स्थानिक यारा क्रॉप न्यूट्रिशन सेंटर्सच्या मजबूत ग्राऊंड नेटवर्कचा लाभ घेत भारतीय शेतकर्‍यांसोबत काम करताना अॅगोरो कार्बन अलायन्स इंडियामध्ये आम्ही खूप उत्साहित आहोत. आम्ही भारतात अशा अलायन्सची प्रतीक्षा करत आहोत, जे आम्हाला लवकरच आमचे व्हिजन प्रत्यक्षात आणण्यास मदत करतील.”       चार खंडांमध्ये कमर्शियल ओपरेशन्स सुरू असलेल्या अॅगोरो कार्बन अलायन्सचा उद्देश तांत्रिक दृष्ट्या प्रगत कार्बन क्रॉपिंग पद्धती अंगिकारून शेतीस डीकार्बनाईझ करण्याचा आणि पृथ्वीतलावरील मातीस तिचा कार्बन परत करण्याचा आहे.

Post a Comment

0 Comments