आम्ही आलो कॉलेजात` प्रगती महाविद्यालयात विद्यार्थ्यामध्ये आनंदी वातावरणप


 
डोंबिवली ( शंकर जाधव ) तब्बल दीड वर्षांनी राज्य सरकारच्या निर्देशानुसार कॉलेज सुरु झाले. `आम्ही आलो कॉलेजात` असे आनंदाने म्हणत पहिल्या दिवशी कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण पसरले होतेडोंबिवलीती प्रगती महाविद्यालय येथेही सरकारी आदेशानुसार आणि नियमानुसार महाविद्याल सुरू करण्यात आले. दुपारी 12: 30 वाजता अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी महाविद्यालयाच्या गेटवर स्वागत केले. कॉलेजच्या गेटवर सॅनिटायझेशन आणि तापमान तपासणी करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.

          वर्गखोल्यांमध्ये प्रत्येकी एका बाकावर एक असे विदयार्थी बसविण्यात आले. वाणिज्यकला आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहमतीपत्रासह येऊन जणू काही महाविदयालय सुरु करण्याच्या मोहिमेला पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहमती दर्शविली होती. ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये न येण्याचा निर्णय घेतला आहे अश्या विद्यार्थ्यांना  आनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. 

         महाविद्यालय व्यवस्थापकानी एकाच वेळी ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षण सुरु ठेवण्याची व्यवस्था करून दिल्यामळे एकाच वेळी दोन्ही म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन अध्यापन करणे शिक्षकाना शक्य झाले. सर्व शिक्षकांनी विदयार्थ्यांना प्रेरित करणारी तासिका घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून विद्यार्थ्यांच्या कोमेजलेल्या मनाला आणि त्यांना संजीवनी प्राप्त करून दिली.

Post a Comment

0 Comments