राज्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्याकरिता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना शिक्षक परिषदेचे साकडे
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  राज्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्याकरिता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना शिक्षक परिषदेने  साकडे घातले आहे.


शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत ते निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने अनेक वेळा शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदने दिली, आंदोलनेही केली. परंतु प्रलंबित प्रकरणांची दखल घेतलेली नाही. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारविनाअनुदानित शाळांना प्रचलित पद्धतीनुसार अनुदान देणेशिक्षकशिक्षकेतर यांचं  समायोजन करून तात्काळ भरती करणे. 


शिक्षक शिक्षकेतर यांना  रेल्वे प्रवासास मुभा देणे. अशा अनेक मागण्यांचे निवेदन नागपूर येथे  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडूशिक्षक आमदार नागो गाणार,  किरण भावठाणकर, नरेंद्र वातकर या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना दिले.त्यावर नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच सभा आयोजित करून तुमचे प्रश्न मांडतो असे सांगितले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख गुलाबराव पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments