पोलीस स्मृती दिना निमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
ठाणे, दि. २१ (जिमाका)   :  पोलीस स्मृती दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहीद पोलीस अधिकारी- कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण केली. वर्षभरात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या देशातील ३७७ शहीद पोलिसांच्या स्मृतींना यावेळी वंदन करण्यात आले.           शहीद पोलिसांच्या बलिदानाची आठवण म्हणून उभारण्यात आलेल्या येथील स्मृतीस्तंभाला पालकमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी अभिवादन केले तसेच शहिद पोलिसांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करीत दिलासा दिला.            यावेळी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुरेश मेखला, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व प्रमुख पोलीस अधिकारी आणि जवान उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments