कळवा रेल्वेस्थानक शेड कमानीचे भूमिपूजन संपन्न,

 कळवा, अशोक घाग :  माजी खासदार आनंद परांजपे यांच्या खासदार निधीतून व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पाठपुराव्यातून गेल्या आठ वर्षां पूर्वी प्रवाशांना उन्हात व पावसाळ्यात सरंक्षण व्हावे यासाठी रेल्वेस्थानकात भव्यशेड उभारला आहे परंतू आता या लोखंडी शेड गंजला आहे. कधीही पडण्याच्या स्थितीमध्ये होती म्हणुन रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते,व नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या पाठपुराव्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आमदार विशेष  निधीमधून भव्यशेड उभारण्यात येणार आहे याचे भूमीपूजन बुधवार(ता 27)ला पार पडले.
           यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी महापौर मनोहर साळवी माजी विरोधी पक्ष नेता नगरसेवक मिलिंद पाटील माजी विरोधी पक्ष नेत्या श्रीमती प्रमिलाताई मुकुंद केणी नगरसेवक महेश साळवी, नगरसेवक प्रकाश बर्डे, नगरसेवक जितेंद्र पाटील नगरसेविका अपर्णा साळवी नगरसेविका,आरती गायकवाड, माजी नगरसोविका मनाली पाटील, राष्ट्रवादी ठाणे शहर उपाध्यक्ष महिला सुरेखा पाटील उद्योजक मंदार केणी परिवहन सदस्य प्रकाश पाटील ठाणे शहर राष्ट्रवादी उपाध्यक्ष अरविंद मोरे माजी परिवहन सदस्य तकी चेऊलकर माजी नगरसेवक सचिन म्हात्रे  राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments