अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी राजेंद्र कोंढरेची बिनविरोध निवड
ठाणे , प्रतिनिधी  :  पुण्यातील कात्रज येथे आरोह गार्डन या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा रविवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेत राज्य भरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी राजेंद्र कोंढरे यांची बिनविरोध निवड केली.           कार्यक्रम प्रसंगी विविध चर्चा करण्यात येऊन ठराव पास करण्यात आले, यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यास लवकरात लवकर आवश्यक त्या निधीची उपलब्धता सरकारने करावी जेणेकरून थकीत व्याज परतावा आणि मिळावा, सारथी संस्थे मार्फ़त विविध कोर्सेस चालू करण्यात यावे, असे ठराव पास करण्यात आला.           मराठा समाजाचे जनजागृती करण्यासाठी व समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी दसऱ्या नंतर राज्यभर दौरा आयोजित करणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी भूषवले. तसेच सर्वानुमते अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी राजेंद्र कोंढरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.            या प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, राष्ट्रीय चिटणीस प्रमोदराव जाधव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख, ॲड. भारती शशिकांत पाटील, प्रभारी ठाणे- नवी मुंबई तसेच राज्यभरातील पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments