भिवंडीत एका माथेफेरूने केलेल्या हल्ल्यात दोन ठार,चार जखमी ,जखमीं मध्ये एक महिला तीन मुलांचा समावेश...
भिवंडी दि 29 ( प्रतिनिधी ) शहरातील शांतीनगर परिसरातील खान कंपाऊंड गैबी नगर येथील रहेमनीया मस्जिद परिसरातील एका चाळीत राहणाऱ्या परिवारावर एक माथेफेरूने केलेल्या चाकू  हल्ल्यात दोघा जणांची हत्या झाली असून चार जण जखमी आहेत त्यामध्ये एक मयताची पत्नी व तीन मुलांचा समावेश आहे .या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे .अन्सार उलहक्क अन्सारी असे हल्ला करणाऱ्या माथेफेरूचे नाव असून या हल्ल्यात कमरुजमा मोहम्मद इस्लाम वय 42 व इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर खान वय 29 या दोघांची हत्या झाली आहे..        पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शुक्रवार असल्याने दुपार च्या नमाज पूर्वी सर्व घरात असताना सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास माथेफेरू आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी याने कमरुजम्मा मोहम्मद इस्लाम अन्सारी याच्या घरात शिरून चाकूने त्यावर हल्ला केला असता घरातील आरडाओरडा नंतर शेजारी राहणारा इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर हा त्याठिकाणी आला असता माथेफेरूने त्यावर व घरातील कमरुजमा ची पत्नी हसीनाबानो, मुले रेहान, आरिफा व आरीबा यांच्यावर सुध्दा चाकू हल्ला करीत सर्वांना जखमी करीत रक्तबंबाळ केले .        व त्या नंतर आरोपी परिसरतील आपल्या घरात गेला असता या गदारोळा नंतर परिसरातील नागरीक धावून येत त्यांनी हल्लेखोर असलेल्या घराला बाहेरून कडी लावून कोंडून ठेवत या घटनेची माहिती शांतीनगर पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी यास त्याच्या घरातून पकडून ताब्यात घेतले तर नागरीकांनी सर्व जखमींना स्व इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी कमरुजमा मोहम्मद इस्लाम व इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर खान हे मयत झाल्याचे घोषित केले तर जखमी पत्नी व मुलांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात रवाना केले आहे .          या हत्त्येच्या गुन्ह्याची नोंद शांतीनगर पोलीस घेत असून या घटने नंतर परिसरात संतापाची लाट उसळत तणावाचे वातावरण निर्माण झाले  आहे .दरम्यान आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी हा परिसरातील मशिदींसाठी देणगी जमा करण्याचे व हिशोब ठेवण्याचे काम करीत असल्याचे व त्यांच्यात यापूर्वी कोणत्यातरी कारणावरून वाद झाला असल्याची माहिती परिसरातील नागरिक देत आहेत.या घटने नंतर आमदार महेश चौघुले हे रुग्णालयात दाखल होत त्यांनी आरोपीस कठोरात कठोर शासन करण्याची मागणी केली आहे..

Post a Comment

0 Comments