ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

 भिवंडी ।  ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे ग्रामीण मधील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा नुकताच प्रवेश सोहळा पार पडला. जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाला युवा कार्यकर्त्यांकडून पसंती मिळत आहे. भुमीपुत्र पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शांताराम म्हात्रे, सागर पाटील यांनी आपल्या शेकडों कार्यकर्त्यांसह काँग्रेस मध्ये प्रवेश केला. भिवंडी तालुका, मुरबाड तालुका तसेच कल्याण ग्रामीण भागातील युवा वर्गाचा यामध्ये समावेश मोठ्या संख्येने होता. त्यामध्ये अनिकेत म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, निवृत्ती म्हात्रे, महेंद्र भोईर, तुषार दळवी, रामकष्ण काकडे, बाळाराम भोईर, निलेश पाटील समवेत शेकडो युवा कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश होता.

भिवंडी, NEWS UPDATE


Post a Comment

0 Comments