दिवाळीपूर्वी सर्व मुख्य रस्ते सुस्थितीत करण्याचे आयुक्तांचे निर्देश

  कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  महापालिका क्षेत्रातील रस्त्‍यांवरील खड्डे भरणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज शहर अभियंता सपना कोळी -देवनपल्ली व संबंधित कार्यकारी अभियंता यांच्या समवेत आढावा बैठक घेवून दिवाळीपूर्वी सर्व मुख्य रस्ते सुस्थितीत करण्याबाबत निर्देश दिले.महापालिका परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांबाबतचा तक्रारी नोंदवण्यासाठी महानगरपालिकेने ८ ऑक्टोबर रोजी १८००२३३००४५  हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला होता. या टोल फ्री क्रमांकावर २९६  तक्रारी आजपर्यंत प्राप्त झाल्या असून त्यापैकी काही तक्रारी पी.डब्लू.डी.काही एम.एस.आर.डी.सी. तर काही तक्रारी एम.आय.डी.सी. च्या होत्या. त्याबाबत संबंधितांना कळविण्यात आले आहे. या टोल फ्री क्रमांकावर एकाच रस्त्याच्या वारंवार तक्रारी नोंदविल्याचे दिसून आले. त्यापैकी महत्वाच्या मुख्य रस्त्यांवरील ४८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.प्रत्यक्षात पावसाने विश्रांती घेतल्यावरख-या अर्थाने दस-यानंतर रस्ते दुरुस्ती/खड्डे भरणीच्या कामास प्रारंभ झाला असून आता सर्व मुख्य रस्ते सुस्थितीत करणेबाबत आयुक्तांनी निर्देश दिले असून ठेकेदारांनी वेळेत काम न केल्यास व कामाची गुणवत्ता राखण्यास अपयशी ठरल्यास संबंधित ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करण्याच्या सुचना आयुक्तांनी या आढावा बैठकीत दिल्या आहेत. तसेच शहर अभियंता यांनी सर्व ठेकेदारांची बैठक बोलवून त्यांच्याकडील कामगारांची संख्या वाढवून रस्त्यांवरील जास्तीत जास्त खड्डे भरणे/बुजवण्याचे काम करण्यात यावेअशाही सक्त सुचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी  यांनी दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments