कुटुंब रंगलंय खेळात एकाच कुटुंबातील ५ जण विविध प्रकारच्या खेळात
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण मधील एकाच कुटुंबामधील आई बाबा आणि मुलं असे पाच जण  क्रीडा क्षेत्रांमधील विविध खेळांमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत.


नुकत्याच हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तनिष्क माजी याने गोळा फेक मध्ये महाराष्ट्र राज्याकडून खेळताना  सुवर्णपदक मिळवत कुटुंबात अजून एका राष्ट्रीय खेळाडूंची भर पडली. तनिष्कचे प्रशिक्षक आई आणि वडील हे दोघेही गत आठ वर्षपासून गोळाफेकची तयारी करून घेत आहेत. वडिल शांती दुलाल माजी हेआपली पोलीस दलातील नोकरी सांभाळत  स्वतः फुटबॉल या खेळात त्यांनी सातत्यपूर्ण खेळ करत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमक दाखवलेली आहे. तसेच ते सध्या महाराष्ट्र पोलीस दलाचे फुटबॉल प्रशिक्षक म्हणून घाटकोपर येते कार्यरत आहेत. आई  नीता शांती माजी नॅशनल ऍथलेटिक्‍स प्लेयर्स म्हणुन रेल्वे आर.पी.एफ. दलात कार्यरत असून अथलेटिक्स या खेळात त्यांनी गोल्ड मेडल मिळवले आहे. तर ईशान आणि दिक्षा हे ॲथलेटिक्स या खेळामध्ये आपलं नशीब अजमावत असून त्यांनीही जिल्हा स्पर्धेमध्ये विशेष चमक दाखवली असल्याची माहिती क्रीडा प्रशिक्षक अविनाश ओंबासे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments