भारताची राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

                                                                                                                          

नागपूर दि.17 :- भारताची राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठीच भारतात स्थापन झालेल्या बौद्ध धम्माची दीक्षा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली असे प्रतीपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.        ।६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ना. रामदास आठवले यांनी नागपूर येथील दिक्षाभूमीला भेट देवून महाकारुणी तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.यावेळी रिपाइं चे प्रदेश अध्यक्ष भुपेश थूलकर ,बाळू घरडे, राजन वाघमारे ;आशिष बुराडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.        दलितांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी दलितांना समतेचे,मानवतेचे नवजीवन  देण्यासाठी भारताची राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी भारतात स्थापन झालेल्या बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशात धम्म क्रांती केली असे ना.रामदास आठवले म्हणाले.          महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे समतावादी भारत साकार करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आम्हा सर्व भीमसैनिकांवर आहे. संविधानाचे संरक्षण; दलितांचे आरक्षण  टिकविणे; दलितांवरील अन्याय अत्याचार रोखणे ही आमच्यावर जबाबदारी आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या योजना केंद्रियराज्यमंत्री म्हणून मी देशभर राबवित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मनस्वी मानणारे आहेत.         त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती निमित्त संसदेचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन घेतले होते.दिल्लीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय केंद्र तसेच 26 अलीपुर येथे भव्य स्मारक उभारले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील संविधानातील समतावादी भारत साकार करण्याची आपली जबाबदारी आहे असे ना रामदास आठवले म्हणाले.


 

         दरम्यान कामठी येथील ड्रॅगन पॅलेस ला ना रामदास आठवले यांनी भेट दिली. तिथे झालेल्या जाहीर सभेत केंद्रीयमंत्री ना नितीन गडकरी; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस;सुलेखा कुंभारे; माजी मंत्री चंद्रकांत बावनकुळे आदी उपस्थित होते.यावेळी ना रामदास आठवले यांनी कविता सादर करीत म्हंटले की          "चंद्रशेखर बावनकुळे आहेत भाजपमुळे; मी आणि सुलेखाताई आहोत माझ्या भिमामुळे ' या उत्स्फूर्त कवितेला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

Post a Comment

0 Comments