प्रभाग क्र २९ मध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ विभाग प्रमुख मोहन उगले यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र २९ ठाणकर पाडा येथे पेव्हर ब्लॉक टाकण्याच्या  कामाचा शुभारंभ विधानसभा संघटक व उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्याहस्ते करण्यात आल्याने शिवसेना विभाग प्रमुख तथा नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.   कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कल्याण पश्चिम मधील प्रभाग क्रमांक २९ ठाणकर पाडा येथील लक्ष्मी जीवदानी निवास या चाळीतील लाद्या खराब झाल्याने येथील नागरिकांनी याबाबत विभागप्रमुख नगरसेवक मोहन उगले यांना याबाबत तक्रार केली होती. सध्या केडीएमसी मध्ये प्रशासकीय राजवट असल्याने  नवीन विकासकामांना खीळ बसला आहे.  मात्र नागरिकांची हि समस्या सोडवणे देखील गरजेचे असल्याने नगरसेवक मोहन उगले यांनी याबाबत आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे पाठपुरावा करून या कामाला मंजुरी मिळवली आहे. त्यानुसार लक्ष्मी जीवदानी निवास या चाळीतील पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा करण्यात आला. त्याप्रसंगी विधानसभा संघटक व उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे, कल्याण शहर संघटक सुजाता धारगळकर, कल्पना जमदाडे, शाखा संघटक सुरेखा दिघे, मीना सावंत, नेत्रा मोहन उगले, कल्पना जमदारे, सुनिता मोरे शाखाप्रमुख स्वप्नील मोरे, अनंता पगार, पिंटू दुबे, राजेश साबळे, रितेश पाबळे, प्रदीप मोरे, दीपक भालेराव, संदीप पगारे, निलेश चोळकर, नितीन कदम, नरेश गडकर, बबन बिन्नर, उमेश भुजबळ, सचिन भाटे, आशिष झाडेप्रदीप हुले, निलेश चोणकर आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments