कल्याण ग्रामीण मधील ठाकूरपाडा परिसरात बिबट्याच्या संचाराने खळबळ

      कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण ग्रामीण भागातील ठाकुर पाडा, रायते परिसरात बिबट्या आढळल्याने रहिवाशांमध्ये "बिबट्या आला रे" या भितिने खळबळ उडाली आहे. कल्याण ग्रामीण परिसरात रायते परिसरातील ठाकुर पाडा येथे आदिवासी महिलेला व त्यांच्या मुलीला बिबट्या दिसल्याच्या चर्चा रगंल्या असुन बदलापुर जवळील जांभुळ, मोहेली, वसद  भागातील जगंल परिसरात बिबट्याचे ठसे आढळल्याचे दोन दिवसापूर्वी वुत्त होते.              तसेच वन विभागाच्या कॅमेरात देखील याठिकाणी बिबट्या कैद झाला होता.  बदलापूर ते  बारावी धरण परिसरात जंगलाचा भाग मोडतो. यामुळे कदाचित बिबट्या हा ठाकूरपाडा परिसरात दिसला असवा. सद्यस्थितीत भात पिकाचा रापणीचा मोसम सुरू आहे. जगंलाच्या आजु बाजुच्या परिसर भाती शेतीमुळे बहरला असुन मोकळा भाग कमी आहे. लगतच जगंलाचा भाग असल्याने बिबट्याचा वावर होऊ शकतो.बिबट्या आढळल्याबाबत कल्याण वन आधिकारी सजंय चन्ने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कीबदलापूर ते बारावी परिसर जगंलाचा भाग असून बिबट्या जगंलात असू शकतोठाकूर पाडा येथे बिबट्या आढळल्याबाबत त्यांनी सांगितले कीआम्ही वनरक्षकांच्या मार्फत गस्त सुरु केली असुन ठाकूर पाडा परिसरात शोध घेतला असता बिबट्याच्या पाऊलांचे ठसे आढळले नसुन  बिबट्या बाबत जन जागृती करीत रहिवाशांना दक्षता बाळगण्याबाबत सूचना केल्या आहेत. जन जागृतीसाठी स्थानिक प्राणी मित्रसंस्थाची मदत घेणार असल्याचे सांगितले. तसेच बिबट्यांने पाळीव जनावरे शेळीम्हैशी  याच्या वर हल्ला केल्याचे दिसले नाही. तरी रहिवाशांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी.

Post a Comment

0 Comments