कल्याण भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेच्या माध्य मातून सर्व धर्मीय प्रार्थनेचे आयोजन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : आज कल्याण भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेच्या आधारवाडी येथील साने गुरुजी विद्यालय येथील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५२ व्या आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या ११८ व्या जयंती निमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन केले गेले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठाणे जिल्हा संघटन आयुक्त संगीता रामटेकेस्थानिक संस्थेचे सचिव दिलीप तडवीकोषाध्यक्ष बाळासाहेब भोसलेसहाय्यक जिल्हा आयुक्त जगन्नाथ सपकाळे यांच्या हस्ते स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडेन पॉवेल आणि लेडी पॉवेल त्याच बरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व पदाधिकारी  यांनी सर्वधर्मीय प्रार्थना गायन केले.प्रार्थनेची सुरुवात ट्रेनिंग कौन्सिलर अपर्णा हर्षे यांनी केली. यावेळी बौद्ध धर्मीय प्रार्थना विजेता रहाटे, जैन धर्मीय प्रार्थना संजय मुसळे, इस्लाम धर्मीय प्रार्थना शबनम शेख आणि हिंदू धर्मीय प्रार्थना अपर्णा हर्ष यांनी गायली. यावेळी संगीता रामटेके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्थानिक संस्थेचे कौतुक केले. त्याच बरोबर जिल्हा संस्थेच्या माध्यमातून सर्व उपक्रम राबवले जातात याविषयी माहिती दिली. त्यानंतर जिल्हा सहाय्यक आयुक्त सपकाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सचिव श्री दिलीप तडवी यांनी स्थानिक संस्थेच्या माध्यमातून वर्षभर राबवलेल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देत असताना सर्व शाळा, गाईडर, स्काऊटर यांचे कौतुक केले तसेच आभारही मानले.शेवटी ट्रेनिंग कौन्सिलर दशरथ आगवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता जाधव यांनी केले. यावेळी स्थानिक संस्थेचे उपाध्यक्ष बाळू भोसले,  सहाय्यक सचिव शशी पाटीलट्रेनिंग कौन्सिलर सुधाकर ठोकेट्रेनिंग कौन्सिलर प्रवीण खाडेस्काऊटर प्रतिनिधी प्रदीप कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments