तेलंगणाच्या बतक्कमा देवीचा भिवंडीतही स्वतंत्र काळा पासून जागर ..


 


भिवंडी दि 14 (प्रतिनिधी ) तेलंगणा राज्यातील बतक्कमा देवीचा भिवंडीतही स्वतंत्र काळापासून जागर  नवरात्रीच्या नऊ दिवसात मोठ्या भक्तींभावाने साजरा केला जातो. मात्र मागील वर्षी कोरोना काळात सर्वच धार्मिक उत्सव सार्वजनिक कार्यक्रम साजरे करण्यावर बंदी असल्याने नवरात्री मध्ये नवमीच्या दिवशी तेलंगणा आंध्रप्रदेश येथील भिवंडी राहणाऱ्या लाखो महिलांचा बतक्कमा सण साजरा करण्यावर निर्बंध असल्याने महिलांचा हिरमोड झाला होता.          परंतु यंदा  कोरोना संकट ओसरत   असल्याने नवरात्रीमध्ये धार्मिकस्थळे उघडण्यात आली. तर निर्बंध ही मोठ्या प्रमाणावर शिथिल आल्याने भिवंडी शहरात सायंकाळी उशिरा असंख्य महिला बतक्कमा देवीचा सण साजरा करण्यासाठी घराबाहेर पडल्या आहेत.

 

पारंपरिक पद्धतीनुसार बतक्कमा देवीचा सण साजरा .. 


बतक्कमा सण हा दक्षिण भारतातील तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यात नवरात्री काळात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .भिवंडी शहरात तेलगू समाजाची संख्या २ लाखच्या आसपास आहे. त्यामुळे  भिवंडी शहरात  देवीचा  सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.            नवरात्री मधील अष्टमीच्या दिवशी सायंकाळी उशिरा ताटात रंगीबेरंगी फुले सजवून अंगणात ठेवून त्या भोवती महिला युवती फेर धरून पारंपारीक गाणी म्हणत नृत्य करीत आनंद साजरा करतात व त्या नंतर उशिरा तलावात ही फुले विसर्जित करतात .हा सण साजरा करण्यासाठी महिला कोरोना ची भीती न बाळगता मास्क ना लावताच साजशृंगार करून या उत्सवात सहभागी झाल्या हे विशेष

 

टोरेंट वीज कंपनीला  सद्बुद्धी दे देवी .. 


 

          भिवंडी शहर हे यंत्रमाग नगरी म्हणून ओळखी जाते. त्यामुळे देशभरातील लाखो नागरिक कामाच्या शोधात येऊन या शहरात वास्तव्यास आली आहे. त्यामध्ये दक्षणी  भारतातील  नागरिकांचे मोठे प्रमाणात आहे. पूर्वी शहतात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने वीजपुरवठा केला जायचा, मात्र  गेल्या १४  वर्षांपासून टोरेंट या खाजगी वीज पुरवठा करणाऱ्या  कंपनीला भिवंडीत शहरात शासनाने वीज पुरवठा करण्याचा ठेका दिला.


 

             त्यातच  गेल्या ४ ते ५ वर्षात अव्व्याच्या सव्वा वीजबिल आकारले जात असल्याने  भिवंडी शहरातील बहुतांश यंत्रमाग कारखाने यामुळे बंद पडली आहे. यामुळे रोजीरोटी साठी आलेल्या तेलगू समजावर इतर व्यवसाय करून पोटापाण्याचा प्रश्न सोडवीत आहे.          त्यामुळे टोरेंट वीज कंपनीला  बतक्कमा देवी सद्बुद्धी देऊन नागरिकांवर वीज बिलाचे संकट दूर करण्यासाठी देवीकडे साकडे घातले आहे. विशेष म्हणजे टोरेंट वीज कंपनीचे वीज मीटर देवीच्या पूजेच्या ठिकाणी ठेवल्याने आता तरी वीज बिलाचे संकट दूर होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


Post a Comment

0 Comments