आर्य गुरुकुल मध्ये मातृपितृ पूजन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या शुभमुहुर्तवर सरस्वती पूजनाचे औचित्य साधून कल्याण पूर्व मधील  आर्यागुरुकुल शाळेत मुलांच्या मनात आई वडिलांविषयी असणारा आदराची भावना जागरुक करण्यासाठी मातृ पितृ पूजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुलांनी आपल्या आई वडिलांचे मनोभावे पूजन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकांनी आपल्या पाल्यांना सर्वांसमवेत आशीर्वाद दिला. यावेळी शाळेच्या शिक्षकांनी मातृ पितृ पूजनाचे महत्त्व मुलांना सांगितले. ६०० पालक आणि विद्याथ्यांनी पालकाविषयी असलेल्या श्रद्धेची प्राचीन परंपरा साजरी करण्यासाठी हा कार्यक्रम ऑनलाईन पाहिला. या वर्षी आम्ही सुमारे २० पालक शाळेत त्यांच्या मुलांसह जमले. त्या प्रसंगी तेथे कोविड प्रोटोकॉल पाळले गेले आणि शाळेच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेतली. दरवर्षी शाळा नवरात्रीदरम्यान मातृ पितृपूजन साजरे करते. मातृ पितृपूजनाचे दिव्य विधी चिन्मय मिशन. ठाण्याच्या आचार्या स्वामिनी निष्कलानंदजी यांनी केले. विद्यार्थी आणि पालकांनी घरी आणि काही पालकांनी व त्यांच्या पाल्यांनी शाळेत उपस्थित राहून मातृपितृपूजनाचा कार्यक्रम साजरा केला. या उत्सवात पवित्र आणि आकाशीय, 'मातृस्तवनम श्लोकसमाविष्ट होते. आईच्या निःस्वार्थ आणि बिनशर्त प्रेमाच्या स्तुतीमध्ये मातृस्तवनम शोकाचे उच्चारण केले. पूजेनंतर नंतर "गरबा" खेळला गेला.

Post a Comment

0 Comments