Header AD

रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रणव पेणकर
कल्याण , कुणाल  म्हात्रे : रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहर कार्यकारणी सभासद रिक्षाचालक अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्ष पदी  दिवंगत नेते प्रकाश पेणकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रणव  पेणकर यांची  सर्वानुमते निवड झाली.रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहरातील प्रस्थापित व बहुसंख्य रिक्षा चालंकाचे पाठबळ असलेली जुनी रिक्षा संघटना आहे. ९ सप्टेंबर रोजी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश नाना  पेणकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याबाबत सामाजिक राजकीय क्षेत्रात चर्चा होती.  मोरया हॉल, बैलबाजार येथे कार्यकारीणी पदाधिकारी सदस्य व रिक्षाचालंकाच्या सर्वसाधारण सभेत प्रणव पेणकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्ती पञ देऊन सत्कार करण्यात आला रिक्षा संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी नियुक्ती व सत्कार प्रसंगी बोलताना सांगितले की, मला नेतुत्वाचे बालकडु प्रेरणा बालपणापासुनच वडिल दिवंगत नेते प्रकाश पेणकर यांच्याकडुन मिळाली आहे. पदाधिकारी व रिक्षाचालकांनी संघटनेची दिलेली जबाबदारी व रिक्षा टॅक्सी चालकांचे प्रश्न प्रामाणिकपणे हाताळुन पद व जबाबदारीला न्याय देण्याचे काम सर्वाच्यां सहकार्याने प्रयत्न करेल या प्रंसंगी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अनेक मान्यवर पदाधिकारी यांनी उपस्थितीत रिक्षा चालकांशी संबोधन केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन उपाध्यक्ष जितु पवार व सहसेक्रेटरी संतोष नवले यांनी केले.याप्रसंगी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अंकुश म्हाञे, शेखर जोशीअविनाश खिलारे, पिकिं भुल्लरबाळा भोईर, अशोक शेटे,निखिल चंदे, डॉ. मनोहर सासे, नगरसेवक मिलिदं पाटील, शिवाजी पाटील, तसेच प्रमुख सल्लागार सतिश मलबारीसुभाष पेणकर, विलास वैद्य, सुबल डेजॉन कॅलिमिनोवैभव हरदास, आबा भसमारे, शगीर शेख, काका मढवी, अब्दुल शेख, हरी भालेरावनूर जमादार, मोहन म्हाञे, बंडु वाडेकरवसंत पाटीलसंजय बागवे, विजय डफळ, हेमंत सांगळेअसगर कुरेशीबापु चतुर, प्रताप सरोदे, जगन्नाथ भागडे, महीला रिक्षाचालक पदाधिकारी कल्पना वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.

रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रणव पेणकर रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रणव पेणकर Reviewed by News1 Marathi on October 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads