खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जनता दरबारात महेश गायकवाड यांची गरजू रुग्णांना आर्थिक मदत


■खासदारांनी केला जागेवरच अनेक तक्रारींचा निपटारा  नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यालयातील जनता दरबारात तक्रारदारांना मिळाला न्याय.....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जनता दरबारात महेश गायकवाड यांनी गरजू रुग्णांना आर्थिक मदत करत पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली आहे.  या जनता दरबारात खासदारांनी अनेक तक्रारींचा जागेवरच निपटारा केल्याने नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यालयातील जनता दरबारात तक्रारदारांना न्याय मिळाला असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत होते.           या जनता दरबारात कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगेमहानगर प्रमुख विजय साळवीशिव कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद मोरे, तसेच ड प्रभागच्या प्रभाग अधिकारी सविता घेले उपस्थित होत्या. जनता दरबराच्या नियोजनात शाखा प्रमुख प्रशांत बोटेनिलेश रसाळ यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले.या जनता दरबारात हृदय विकारने त्रस्त असलेल्या आणि डोंबिवलीतील ज्युपिटर रुग्णालयात दाखल असलेल्या तनिष्का राजन सहाने या  ७ महिन्याच्या बालकाच्या तिसर्‍या शस्त्रक्रियेसाठी छोटी का होईना मदतीचा हात म्हणून महेश गायकवाड यांनी २० हजारांची आर्थिक मदत बालकाच्या नातेवाईकांना दिली. तर मेंदू ज्वराने कल्याणच्या फोर्टीज रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल  असलेल्या अशोक लोहार या रुग्णाच्या नातेवाईकांकडेही महेश गायकवाड यांनी २० हजारांचे अर्थ सहाय्य सुपूर्त केले.            कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आपल्या मतदार संघात ठीकठीकाणी जनता दरबार घेऊन नागरीकांच्या तक्रारींना न्याय देत आहेत. याचाच एक भाग म्हणून कल्याण पूर्वेत नगरसेवक महेश गायकवाड यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जनता दरबारात दिडशेहून अधिक तक्रारदारांनी हजेरी लावून आपल्या तक्रारीं पाढा खासदारांसमोर मांडला.
         
               या पैकी सुमारे ८० टक्के तक्रारींचे निवारण डॉ. शिंदे यांनी संबंधीत अधिकार्‍यांशी संपर्क साधून निकाली काढल्याने या जनता दरबारात आपल्याला त्वरीत न्याय मिळाल्याने तक्रार दारांचे समाधान झाल्याचे महेश गायकवाड यांनी सांगितले. बहुतांशी तक्रारी या महापालिका प्रशासनाशी संबधीत असल्याने तक्रारीच्या स्वरूपानुसार खासदार महोदयांनी त्या त्या अधिकार्‍यांशी त्वरीत संपर्क साधून तक्रारदारांच्या तक्रारींची दखल घेऊन उचित कारवाईचे निर्देश संबंधीत अधिकार्यांना दिले. 

Post a Comment

0 Comments