अन्न औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांकडे व्यापाऱ्यांशी संवाद साधण्याची मागणी


■कल्याण शिव-भीम मिठाई, मावा, खवा व ट्रान्सपोर्ट चालक मालक, व्यापारी कामगार संघटनेची मागणी...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : अन्न औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांकडे व्यापाऱ्यांशी संवाद साधण्याची मागणी कल्याण शिव-भीम मिठाई, मावा, खवा व ट्रान्सपोर्ट चालक मालक, व्यापारी कामगार संघटनेनी केली आहे. या संवाद मीटिंग मध्ये पोलीस खात्याचे ६ वरिष्ठ अधिकारी देखील बोलाऊन व्यापारीग्राहकअधिकारीपोलीस यांना अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमन २०११  हे आत्ता नवीन कायदे झाले असून त्या बाबत आपले अधिकार काय आहेत याच्या माहिती साठी व्यापाऱ्यांशी संवाद साधण्याचे आवश्यक असून याबबत बैठकीसाठी वेळ देण्याची मागणी कल्याण शिव-भीम मिठाई, मावा, खवा व ट्रान्सपोर्ट चालक मालक, व्यापारी कामगार संघटनेने  ठाणे कोकण विभागीय सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सागर पगारे, सचिव जयदीप सानप, उपाध्यक्ष लखपत राजपूत, खजिनदार राजा जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.पालघर जिल्हा तलासरी दापचेरी आच्छाड चारोटी शिरसाठ नाका पोलिस हे नेहमी खवा व्यापारी यांवर अनैतिक कारवाई करतात. त्यांनी आत्ता पर्यंत २ वेळेस अनैतिक कारवाई केली असून त्यात व्यापारी यांचे लाखो रू नुकसान झाले. त्यांनी भरले सर्व नमुने प्रमाणित झाले आहेत याची माहिती यावेळी देशमुख यांना दिली तसेच पोलीस प्रशासन यांना आपण त्यांचे काय अधिकार आहेत काय नाहीत त्यांनी काय करावे किंवा काय करू नये या बाबत लेखी कळवावे. टायनी जप्त केलेला माल हा स्व खर्च किंवा शासकीय खर्चाने नमुने अहवाल येईपर्यंत कोल्ड स्टरेज मध्ये ठेवावा अशी विनंती केली. कोणतेही नमुने प्रमाण न येताच पोलीस खवा नकली बनावटी छापतात. कागदोपत्री लिहितात त्यामुळे नकली डूब्लीकेट याची व्याख्या काय आहेत त्या बाबत पोलीस यांनाही ही धडे द्यावे तसेच नमुने अहवाल जलद गतीने प्राप्त व्हावे. अशी मागणी संघटनेने केली. याबाबत सहाय्यक आयुक्तांनी व्यापाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments