Header AD

बंदच्या नावाखाली रिक्षाचालकांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा – शिवाजी गोरे


■कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : बंदच्या नावाखाली रिक्षाचालकांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायत महाराष्ट्राचे सरचिटणीस ठाणे जिल्ह्याचे प्रभारी शिवाजी गोरे यांनी केली असून संबंधितांवर कारवाई न केल्यास  कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गोरे यांनी दिला आहे.उत्तर प्रदेश मध्ये शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडले म्हणून सोमवारी महाराष्ट्रात बंद जाहीर करण्यात आला. या घटनेचा आम्ही निषेध करत असून महाराष्ट्र बंदला आम्ही रिक्षा बंद न ठेवता पाठिंबा दिलेला आहे. परंतु बंदच्या नावाखाली दहशत दादागिरी करून हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब रिक्षाचालकांना मारहाण करण्यात आली. याबाबतचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये वायरल झाला असून, रिक्षाचालकांना मारहाण करणार्‍या तथाकथित नेते वकार्यकर्त्यांवर  तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी. अन्यथा रिक्षा चालक मालक यांच्या वतीने ठाणे जिल्हा बंद करून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवाजी गोरे यांनी दिला आहे.रिक्षाचालकांना मारहाण करणे हे कदापि सहन केले जाणार नाही. कोविड काळामध्ये १४ महीने रिक्षा व्यवसाय बंद होता अशा परिस्थितीमध्ये आम्ही महाराष्ट्र सरकारकडे दहा हजार रुपये आर्थिक मदतीची मागणी केली होती. सरकारने मात्र अत्यंत तुटपुंजे दीड हजार रुपये आर्थिक मदत केली ती अजून देखील मिळाली नाही. महाराष्ट्र सरकारकडे रिक्षाचालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यात कल्याणकारी मंडळ, बेकायदेशीर वाहतूक, मुक्त रिक्षा परवानाफायनान्स कंपन्याकडून दादागिरी बेकायदेशीर वसुली अशा असंख्य प्रश्‍न प्रलंबित आहेत ते प्रश्न  महाराष्ट्र सरकारने सोडवणे आवश्यक आहे.    परंतु रिक्षाचालकांचे प्रश्न सोडवल्या ऐवजी रिक्षाचालकांना जबरदस्तीने बंदमध्ये सहभागी करण्यास भाग पाडणे हे बरोबर नसून याबद्दल महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने लक्ष ठेवून प्रश्न सोडवणे आवश्यक आहेपरंतु त्या प्रश्न सोडवण्याऐवजी रिक्षाचालकांना मारहाण करण्यात येत आहे. या घटनेची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शिवाजी गोरे यांनी केली आहे.
बंदच्या नावाखाली रिक्षाचालकांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा – शिवाजी गोरे बंदच्या नावाखाली रिक्षाचालकांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा – शिवाजी गोरे Reviewed by News1 Marathi on October 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads