कार्यकर्त्यां वरील खोट्या तक्रारी सहन करणार नाही – नगरसेवक कुणाल पाटील


■क्षीरसागर दाम्पत्यांच्या खोट्या तक्रारींमुळे आडीवली ढोकळीतील रहिवासी त्रस्त...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  क्षीरसागर दाम्पत्यांच्या खोट्या तक्रारींमुळे आडीवली ढोकळीतील रहिवासी त्रस्त झाले असून कार्यकर्त्यांवरील खोट्या तक्रारी सहन करणार नाही असा इशारा नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला आहे. आडीवली परिसरात राहणाऱ्या क्षीरसागर दाम्पत्यांच्या खोट्या तक्रारींबाबत येथील महिलांनी मानपाडा पोलिसांना निवेदन दिले असून यावेळी कुणाल पाटील पत्रकारांशी बोलत होते.आडीवली ढोकळी परिसरात क्षीरसागर दाम्पत्य कोणत्याही कारणांवरून धमक्या देणे, भाजीवाल्यांकडून पैशांची मागणी करणे. महिला मंडळाच्या नावाखाली खोट्या तक्रारी करून नागरिकांना मानसिक त्रास देणे असे प्रकार करत असल्याचा आरोप येथील महिलांनी केला आहे. अशाच प्रकारे खोटी तक्रार करून कुशाल पाटील नामक तरुणाला देखील धमकावण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. तसेच राजकीय वैमनस्यातून कुणाल पाटील यांची देखील खोट्या तक्रारी करून बदनामी करत असून याबाबत येथील ६० ते ७० महिलांनी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली मानपाडा पोलिसांना निवेदन दिलं आहे.यापुढे आपल्या कार्यकर्त्यांबाबत खोट्या तक्रारी केल्यास त्या आपण सहन करणार नसून कायदेशीर मार्गाने या तक्रारी करणाऱ्यांचा समाचार घेतला जाईल असा इशारा कुणाल पाटील यांनी दिला आहे. तर येथील महिलांनी पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबत संदीप क्षीरसागर यांना विचारले असता, आम्ही केलेली तक्रार हि योग्य असून याचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध आहे. याबाबत मानपाडा पोलिसांनी योग्य तो तपास करावा असे सांगितले.   

Post a Comment

0 Comments