डोंबिवलीत दसऱ्याला झाली सुमारे १० कोटी रुपयांची सोने खरेदी यावर्षी केवळ २५ टक्के सोने विक्री

डोंबिवली ( शंकर जाधव )  हिंदू रितीरिवाजानुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदीवर सर्वसामान्यांचा भर असतो. कोरोना महामारीनंतर अनलॉक झाले आणि काही प्रमाणात सर्व व्यवहार सुरू झाले. काल शुक्रवारी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांनी सोने खरेदी केले. डोंबिवलीत सुमारे १८ हजार ग्रॅम सोन्याची विक्री झाली. जरी ही विक्री १० कोटी रुपयांवर असली तरी सोने खरेदी २५ टक्केच झाली असे मत शहरातील ज्वेलर्स व्यक्त करीत आहेत. परंतु हा सोने खरेदी व्यवहार मोठ्या प्रमाणात डिजिटल माध्यमातून झाल्यामुळे "डिजिटल इंडिया" योजना सफल झाली आहे.
         डोंबिवली  ज्वेलर्स असीसीएशनचे उपाध्यक्ष सुरेश सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात सुमारे ४६० ज्वेलर्सची दुकाने असून प्रत्येक विभागात दसऱ्यानिमित्त सोने खरेदी करण्यासाठी गर्दी होती. शहरात अनेक छोटे ज्वेलर्सचे व्यापारी असले तरी मोठे नावाजलेल्या सुवर्णलंकारांच्या मोठ्या पेढ्याही आहेत. दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ४८,९०० रुपये   होता. यावर्षी कोरोनामुळे ज्वेलर्स दुकानात खरेदीवर येतील का याचा प्रश्न ज्वेलर्सना होता.
              दसऱ्यानिमित्त शहरात होत असलेल्या सोने खरेदीबाबत डोंबिवली ज्वेलर्स असोशिएशन उपाध्यक्ष सोनी सांगतात की, लॉकडाऊन पूर्वी दसऱ्यामुहूर्तावर सोने खरेदी मोठया प्रमाणात होत असे. साधारण शहरातून ४० कोटी रुपयांची सोने खरेदी होत होती. यावर्षी असता ती १० कोटींवर आली असल्याने ७५75 टक्के खरेदीवर फरक पडला आहे. पण यावर्षी ही खरेदी झाली ही विशेषबाब आहे.
             यावर्षी जास्त सोने खरेदी मध्यमवर्गीय नागरिकांनी केली आहे. काही जण आद्यप सोन्यामध्ये पैसे गुंतवणूकसाठी तयार नसल्याचे दिसून येत आहे. काही प्रमाणात आर्थिक चणचण असू शकते. पण यावर्षी मोठया प्रमाणात म्हणजे ९५  टक्के सोने खरेदी डिजिटल माध्यमातून झाली. दसऱ्याच्या मुहूर्तानंतर ज्वेलर्स व्यावसायिकांच्या कारभारात तेजी येत असते. कारण दिवाळीतही सोने खरेदी होते आणि त्यानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होतो.

            त्यामुळे सोन्याचे दागिने तयार करणे, ऑर्डर देणे अशा पद्धतीने ज्वेलर्सची दुकाने ग्राहकांनी भरलेली असतात. दिवाळी मोसमात चांदी खरेदीही होत असते. यावर्षी दसऱ्यानिमित्त सोन्याच्या आपट्याच्या पानाला चांगली मागणी होती, १ ग्रॅम, अर्धा ग्रॅम अगदी पाव ग्रॅम सोन्याच्या आपट्याची पाने ग्राहकांनी खरेदी केली.

Post a Comment

0 Comments