स्किलअप ऑनलाइनची पॅसिफिक लूथरन विद्यापीठासोबत भागीदारी


■उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्यातून उद्देश्यपूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रम आणणार ...


मुंबई, २५ ऑक्टोबर २०२१ : अत्यंत वेगाने उत्क्रांत होत असलेली वैश्विक रोजगाराची बाजारपेठ आणि जनरेशन झेडमधील विद्यार्थ्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी स्किलअप ऑनलाइनने पॅसिफिक लूथरन विद्यापीठासोबत रणनीतिक भागीदारीची घोषणा केली आहे. या माध्यमातून भविष्याचा वेध घेणारे उद्देश्यपूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रम सादर केले जाणार आहेत.        विद्यार्थी आणि युवा व्यावसायिकांना परिवर्तन घडवून आणणारा हा शैक्षणिक अनुभव मिळावा म्हणून संस्कृती विद्यापीठ आणि रयात बाहरा विद्यापीठांसारख्या प्रतिष्ठित संस्थांनी आधीच या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे, स्किलअप ऑनलाइन विद्यार्थ्यांना फ्युच्युरिस्टिक आणि परिवर्तनशील शैक्षणिक कार्यक्रम उपलब्ध करून देण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. त्याला विशेष क्लाऊड कॉम्प्युटिंग सुविधांचे पाठबळ पुरवण्यात आलेले आहे.     स्किलअप समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष श्रीयुत जे.पी.एस. कोहली म्हणाले, “आमच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवताना आम्ही अत्यंत रोमांचित झालो आहोत. नव्या भारताचे निर्माण प्रगतीपथावर आहे. २०२० मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सादर झाल्यामुळे परदेशी विद्यापीठांना भारतात आपला कॅम्पस उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. ही लाट शैक्षणिक पर्यावरणात अमुलाग्र बदल घडवेल, असा आम्हाला विश्वास आहे.       व्यावसायिक शिक्षण आणि नागरी सहभागाचे समायोजन करण्याचा पॅसिफिक लूथरन विद्यापीठाला प्रदीर्घ आणि दैदिप्यमान इतिहास आहे. तसेच त्याला अमेरिकेतील सर्वोत्तम बिझनेस स्कूलपैकी एक संस्था असण्याचा बहुमानही मिळाला आहे. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही अद्ययावत तंत्रज्ञान आणि आंतरपरस्पर कौशल्यांनी विद्यार्थी आणि युवा व्यवसायिकांचे सक्षमीकरण तथा सुसज्जीकरण होण्याची आशा व्यक्त करतो. यातून त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रशस्त होईल.”      स्किलअप ऑनलाइनने धोरणात्मक विचाराअंती अतिशय काटेकोररीत्या तीन वर्षांची योजना आखली आहे. उद्देश्यपूर्ण अभ्यासक्रमांच्या मजबूत पायाभरणीसाठी स्किलअप ऑनलाइन आपली ऊर्जा ओतत आहे. काही निवडक अभ्यासक्रमांचा प्रारंभ आणि तसेच व्हर्च्युअल इन्स्ट्रक्टर लेड ट्रेनिंगच्या (VILT) माध्यमातून विषयतज्ज्ञ आणून ही योजना तडीस नेली जाणार आहे. त्याला पूर्णपणे सहाय्यक मार्गदर्शक व वन टू वन मार्गदर्शकांची जोडही दिली जाणार आहे.       २०२२ पर्यंत स्किलअप ऑनलाइन आपल्या पोर्टफोलियोत अनेक कौशल्यविकास आणि शैक्षणिक कार्यक्रमांची भर घालणार आहे. याद्वारे किरकोळ व महत्त्वपूर्ण शैक्षणिक कार्यक्रमांच्या दिशने समग्र पाठ्यक्रमाला आकार देण्यात येईल. तसेच २०२३ वर्षाच्या अखेरपर्यंत हा ब्रँड विद्यार्थी आणि क्रेडिट एक्स्चेंज कार्यक्रम सादर करणार आहे. या द्वारे आजच्या आधुनिक पीढीला त्या त्या श्रेणीतील सर्वोत्तम संधी मिळाव्यात, या यामागील हेतू आहे.

Post a Comment

0 Comments