भिवंडी ग्रामीण शिवसेनेनेचे आमदारांना शांताराम मोरे यांना माहिती देण्यास भिवंडी प्रांता धिकारी कार्यालयाची टाळाटाळ...

 
भिवंडी दि 14 ( प्रतिनिधी ) भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत अनेक शासकीय प्रकल्प येत असून या प्रकल्पांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत या बाधित जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना देतांना भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयातून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी भिवंडी ग्रामीण शिवसेनेनेचे  आमदार शांताराम मोरे यांच्या कडे आल्याने बाधित जमीन प्रकरणां मध्ये शेतकऱ्यांना किती व कसा मोबदला प्रताधिकार कार्यालया कडून देण्यात आला आहे .
            याची माहिती आमदार शांताराम मोरे यांनी लेखी पत्राद्वारे भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयाकडून मागितली आहे तसेच सण २०१९ - २० मध्ये प्रांताधिकारी कार्यालयात संगणक व प्रिंटर खरेदीत देखील भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी देखील आमदार शांताराम मोरे यांच्याकडे आल्याने या वस्तू खरेदी बाबतची माहिती देखील आमदार शांताराम मोरे यांनी लेखी निवेदनाद्वारे भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयाकडे मागितली आहे.           मात्र आमदारांच्या पात्राला प्रताधिकार कार्यालयाने केराची टोपली दाखवली असून तब्बल दिड महिन्यांपासून माहिती देण्यास टाळाटाळ केली असल्याने भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयातून झालेल्या व्यवहारांच्या बाबत येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती आमदार शांताराम मोरे यांनी दिली आहे . 

Post a Comment

0 Comments