नोव्हेंबर अखेर पर्यंत भिवंडीत कोरोना लसीचा पहिला डोस पूर्ण करणार, नागरिकांनी सहकार्य करावे...आयुक्त सुधाकर देशमुख

 भिवंडी , प्रतिनिधी  :  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड 19 लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आपल्या शहरात कोविड लसीकरणाचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे जर यदा कदाचित तिसरी लाट आली तर त्याचा फटका शहरातील नागरिकांना बसू शकतो. या तिसऱ्या लाटेची  तीव्रता कमी करण्यासाठी व लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2021 दरम्यान राज्यात सर्वत्र विशेष कोंविड लसीकरण मोहीम, मिशन कवच-कुंडल हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
         यानुसार भिवंडीतील नागरिकांना देखील आवाहन करण्यात येत आहे की, नजीकच्या काळात नवरात्र उत्सव  तसेच दिवाळी कोरोना मुक्त साजरी करण्यासाठी नागरिकांनी स्वतःचे  लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.  नोव्हेंबर 2021 अखेपर्यंत पहिल्या डोसचे उद्दीष्ट पूर्ण करणार,  अशी माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली. भिवंडी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची टास्क फोर्स व शहरातील विविध मशिदमधील व्यवस्थापक, मुस्लिम धर्मगुरू, मोलाना यांचेसह आयुक्त यांनी बैठक घेतली, त्यावेळी आयुक्त  देशमुख बोलत होते. 
        यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी कारभारी खरात, वैद्यकीय अधिकारी जयवंत धुळे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, बैठक आवाहन जेणेकरून कोरोनाची लागण होण्याची भीती कमी होईल या पार्श्वभूमीवर शहरात दररोज किमान पंधरा हजार नागरिकांच्या लसीकरण होईल असा असा प्रयत्न चालू आहे याकरिता 15 आरोग्य केंद्र अंतर्गत 30 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत तीस लसीकरण केंद्र अंतर्गत रोज किमान पाचशे लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करावयाचे आहे,  अशा प्रकारे रोज पंधरा  हजार लसीकरण झाल्यावर  नोव्हेंबर 2021 पर्यंत  वय वर्ष 18 वर्षावरील भिवंडी शहरातील सर्व नागरिकांच लसीकरण करणे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवलेले आहे.         लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्यात आली आहे त्याचा फायदा नागरिकांना घ्यावे असे आवाहन पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केली आहे.यावेळी वैद्यकीय अधिकारी कारभारी खरात तसेच डॉ.जयवंत धुळे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, भिवंडी वैद्यकीय संघटना  अध्यक्ष डॉ.उज्ज्वला बर्दापूरकर तसेच विविध मशिदिमधील  मौलाना हलिमुल्लाह 
कासमी, मौलाना फैयाज कासस्मी, मौलाना अवाफ फलाही, मौलाना शमशाड उस्वाह,मौलाना राईस नाडवी, मौलाना असद कासमी, बिलाल गुजराती आयेशा , मशीद,  हाफी शहीद, इत्यादी धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
             कोविड लसीकरण उद्दीष्ट पूर्ण करणे सर्व 15 आरोग्य केंद्र अंतर्गत 30 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत.तसेच काही ठिकाणी खाजगी रुग्णालये यांना देखील परवानगी देण्यात आली आहे. रोज  किमान 15,000 लसीकरण केल्यावर आपण या नोव्हेंबर अखेर पर्यंत पहिला डोस 5,89,000 चा इष्टांक पूर्ण करू, व संभाव्य तिसऱ्या लाटेपासून आपला बचाव करू शकतो.              पण या कामी सर्व नगरसेवक, विविध पक्षांचे कार्यकर्ते तसेच , धार्मिक, सामाजिक सेवाभावी संस्था  संस्था याचे नेतृत्व करणाऱ्या नागरिकांनी कोरोना  लसीबाबतचे सर्व गैरसमज दूर करावे, व नागरिकांना लसीकरण करणेकरीता प्रोत्साहित करावे असे व आपले शहर कोरोना मुक्त करणेकामी सहकार्य करावे आवाहन देखिल आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments