डोंबिवलीतील रस्त्यातील खड्डे भरणी म्हणजे देखाव्याची मलमपट्टी


 


 

डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील खड्डे भरणीचे काम हे केवळ देखाव्याची मलमपट्टीचअसल्याचे दिसते. खड्ड्यात छोटे दगड व माती टाकून खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. डोंबिवली शहरात व ग्रामीण विभाग म्हणून चार प्रभागक्षेत्र माध्यमातून मूलभूत व पायाभूत सुविधांवर प्रशासन काम करीत आहे. औद्योगिक विभागातील निवासी भागात रस्त्यांची दैना झाली असून नागरिक दरोरोज तक्रार करीत असतात.
          डोंबिवलीतील पूर्व आणि पश्चिम  सीमेंट काँक्रीट रस्ते सोडले तर अंतर्गत रस्ते म्हणजे खड्यांची मालिका होईल. पालिकेच्या `` प्रभागक्षेत्र अंतर्गत नवापडाजुनी डोंबिवलीमहाराष्ट्रनगरमोठागांव ठाकुर्लीठाकूरवाडीगरिबाचा वाडादेवीचा पाडागणेशनगर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. गेल्या आठवड्यात पावसाची संततधार असल्याने प्रशासनाला खड्डे बुजवणे काम करता येत नव्हते. 

         मात्र दोन दिवसांपूर्वी ठाकरे सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख बजावले कीरस्त्यावरील खड्यांबाबत समस्या निर्माण झाली तर त्याला जबाबदार कामचुकार प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार ठरतील. यामुळे अधिकाऱ्यांना जाग आली असून आता खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. परंतु खड्ड्यात केवळ खडी टाकून त्यावर रोलर फिरवून खड्डे बुजविल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. 

        याबाबत नागरिक सांगतात कीअसे खड्डे भरणी काम म्हणजे आणखी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशा पद्धतीने भरलेल्या खड्ड्यांमधून दोन चाकी व चार चाकी गाड्या धावताना खड्यातील खडी-दगड उडतो आणि तो कोणालाही लागू शकतो. अशी अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आली आहेत. 

        याबाबत प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पाटील यांना संपर्क साधला असता तो विषय अभियंता यांच्याशी निगडीत असून ते याबाबत माहिती देतील परंतु संबंधित अभियंताकडे संपर्क होऊ शकला नाही.  शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते बुजविल्याचे काम सुरू आहे. पण ते कितपत टिकाऊ काम होईल याची शास्वती नाही अशी चर्चा डोंबिवलीकर करीत आहेत.

Post a Comment

0 Comments