दुर्गा फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्त भागात शैक्षणिक साहित्याची मदत
कल्याण , कुणाल  म्हात्रे : दुर्गा फाऊंडेशनच्या वतीने महाड तालुक्यातील पुरग्रस्त,भागातील,आकले, भोरमहाड, कांबले शिदेंवाडीतांदळेकरवाडीविठ्ठलवाडीचाढवे थरवळ कन्या विद्यालय आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी दुर्गा फाऊंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा शोभा भोईर, सचिव ध्रुव भोईरठाणे जिल्हा अध्यक्षा अक्षता केणीगार्गी भोईर, शिक्षक सहकारी पतपेढी अध्यक्ष सुभाष भोपी, राजेंद्र मोकल आणी शिक्षक वर्ग उपस्थित होते.तब्बल दीड वर्षानंतर राज्यातील शाळा सुरु झाल्या त्या निमित्ताने दुर्गा फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यापुस्तकेपेनपेन्सिलअपोहार देवुन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पुरग्रस्तभागात अनेक नेत्यांनीसंस्थानी अन्नधान्याचीजीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. परंतु जीवनावश्यक वस्तू बरोबर "शिक्षण" देखील  अत्यंत महत्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन दुर्गा फाऊंडेशनच्या वतीने  १५० विद्यार्थीना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती दुर्गा फाऊंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा शोभा भोईर यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments