कल्याणमध्ये विजयादशमी निमित्त श्री महादौड उत्साहात
कल्याण, कुणाल म्हात्रे  : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी नवरात्रीमध्ये श्री दुर्गा माता दौड तसेच विजयादशमी निमित्त श्री महादौड संपूर्ण महाराष्ट्रात होत असते. याच धर्तीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कल्याण विभागातर्फे श्री दुर्गामाता महादौडीचे आयोजन करण्यात आले होते.            त्याला संपूर्ण कल्याण शहर, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, पालघर येथील धारकरी तसेच स्थानिक रहिवाशी यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राहुल महाजनकल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, संजय मोरेनरेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवरही उपस्थित होते.या महादौडीचे विशेष महत्त्व म्हणजे बालशिवबा शंभूबाळ आणि आऊसाहेब जिजाऊ या वेशभूषा करून आलेले छोटे धारकरी आणि त्याच्या आईसाहेब. पारंपरिक वेशभूषा विजयादशमी निमित्त केले जाणारे शस्त्रपूजन मग त्यात वेगवगळी शस्त्रे, तोफ आणि घोषणा यांनी दणाणून टाकणारा परिसर. श्री तिसाई माता मंदिर ते श्री किल्ले दुर्गाडी असा मार्ग असलेली ही दौड मार्गात येणाऱ्या प्रत्येक मंदिराजवळ पुजली गेली.
 तसेच जेथे जेथे दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठा केलेले मंडळे होती त्यांनीही स्वागत केले आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ध्वजाचे झालेले पूजन हे एकीचे प्रतीक होते. तेथे पोलीस सहकारी धारकरी स्थानिक ये जा करणारे मार्गस्थ देखील एक होऊन ध्वजपूजन सोहळ्यात एकत्र होते.

Post a Comment

0 Comments