शिवसेनेच्या वतीने मदतीने गरिबांची दिवाळी आनंदात...

 डोंबिवली ( शंकर जाधव ) २०२० साली करोना महामारीने दैनदिन जीवन हलाखीत जगण्यास भाग पाडले होते.सण साजरा करताना नागरिकांना आपल्या खिशाकडे बघावे लागत होते.२०२१च्या ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दिवाळी सण साजरा केला जात आहे. मात्र गरिबांना दिवाळी साजरी कशी करावी असा प्रश्न पडला होता.या परिस्थितीकडे शिवसेने लक्ष दिल्याने डोंबिवलीतील राहणाऱ्या अनेक गोर-गरिबांची दिवाळी आनंदात जाणार आहे.  


     नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, कल्याण जिल्हा उपजिल्हाप्रमुख पुंडलिक म्हात्रे,सदानंद थरवळ,डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली उपशहर संघटक गजानन व्यापारी आणि डोंबिवली युवा सेना उपशहर अधिकारी चिन्मय व्यापारी, शाखाप्रमुख दिलीप चाटसे,शीतल प्रसाद यादव,समाधान पवार, संतोष तांदळे, चेतन सावंत यांनी डोंबिवली पूर्वेकडील रामनगर येथील क्रांतीनगर झोपडपट्टी,आदर्श नगर,सय्यद इमारत, पोलीस लाईन, टाटा लाईन येथे दिवाळीचे साहित्य वाटप केले.


         यावेळी चिन्मय व्यापारी म्हणाले,गरिबांची घरात दिवाळी मोठ्या उत्सहात साजरी झाली पाहिजे या उद्देशाने आमच्याकडून हा छोटासा प्रयत्न आहे.कितीही आणि कोणतेही संकट आले तरी शिवसेना  नेहमीच जनतेसाठी पुढे आली आहे.तर क्रांतीनगर झोपडपट्टीतील रहिवाश्यांनी शिवसेनेचे आभार मानत गरिबांची दिवाळी चांगली जाणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments