स्थानिक पातळीवर कोण काम करतंय हे नागरिकांना माहीत आहे - वरुण सरदेसाई


■अमित ठाकरे यांच्या खड्डयावरील टीकेला युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई यांचे प्रत्युत्तर...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : स्थानिक पातळीवर कोण काम करतंय हे नागरिकांना माहीत असल्याचे सांगत अमित ठाकरे यांच्या खड्डयावरील टीकेला युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कल्याण डोंबिवलीमधील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी वरूण  सरदेसाई आज कल्याणात आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी हे विधान केलं. यावेळी कल्याण पूर्व संपर्क प्रमुख शरद पाटील, उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, नगरसेवक महेश गायकवाड, निलेश शिंदे, दिपेश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.मनसे नेते अमित ठाकरे कालपासून कल्याण-डोंबिवलीचा दौऱ्यावर आहेत. कल्याण-डोंबिवली मधील मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. याच दरम्यान अमित ठाकरे यांनी खड्ड्यांवरून शिवसेनेचं लक्ष केलं. पंचवीस वर्षे सत्ता असतानाही काम होऊ शकत नाहीत असा आरोप त्यांनी केला होता. या टीकेला आज युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिले. सरदेसाई यांनी अमित ठाकरे यांना उद्देशून  ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या पक्षाच काम करण्याचा त्यांना अधिकार आहे. गेली पंचवीस वर्ष कल्याण डोंबिवली मधील नागरिकांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला, हा विश्वास खरा करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे  नेते, पदाधिकारी दिवस-रात्र काम करतात स्थानिक पातळीवर कोण काम करत आहे नागरिकांना माहिती आहे. येत्या  निवडणुकीत नागरिक पुन्हा शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला.दरम्यान रामदास कदम यांच्या ओडियो क्लिप बाबत वरूण सरदेसाई यांना विचारले असता, ती ऑडियो क्लिप अजून ऐकली नसल्याचे त्यांनी सांगितले. दापोली येथील अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांवर जी कारवाई झाली आहे ते पुरावे शिवसेनेचे रामदास कदम यांनी पुरवले असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या संदर्भातली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रश्नाचा उत्तर देताना  वरून वरून सरदेसाई यांनी ती ऑडिओ क्लिप मी अजून ऐकली नाही, त्यामुळे या ऑडिओ क्लिप वर मी भाष्य करू शकत नाही असे सांगीतले.

Post a Comment

0 Comments